नूतन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा कुकाण्यात सन्मान यावेळी नागरिकांशी साधला संवाद.

नूतन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा कुकाण्यात सन्मान यावेळी नागरिकांशी साधला संवाद.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याला लाभलेले नूतन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचा कुकाणा परिसर, ग्रामपंचायत व विविध संघटने

च्या वतीने सन्मान करण्यात आला.

           हा कार्यक्रम माजी सरपंच एकनाथ कावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी सेनेचे अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर यांनी केले. यावेळी पत्रकार बाळासाहेब सरोदे, पत्रकार युनूस पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

      यावेळी नूतन पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी नागरिकांशी संवाद साधत म्हणाले की, विविध संघटनेच्या ,शाखेच्या, पत्रकाराच्यावतीने जो काही सन्मान झाला . मी भारावून गेलो आहे .मला कूकाणा परिसरातील लोकांनी भरभरून प्रेम दिले. या तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी सर्व प्रशासन सोबत घेऊन उत्तम काम करण्याचे प्रयत्न करीन व तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील. समाजातील दुर्बल , गरीब घटक यांच्यावरील होणारा अन्याय थांबवण्याचा प्रयत्न करुन ज्या त्या वेळेस योग्य ती कारवाई केली जाईल. जर काही गैरप्रकार चालत असेल तर मला कधीही फोन करून कळवा नक्कीच त्या घटनेचे गांभीर्य घेतले जाईल. आम्ही जनतेचे सेवक आहोत. तुम्ही सर्व जनता मला सहकार्य करेल अशी अपेक्षा करतो व सर्वांचे ऋणी राहीन .या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

       यावेळी मा.उपसभापती अशोकराव मंडलिक ,माजी सरपंच दौलतराव देशमुख , एकता पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे सर ,पत्रकार सोपान भगत, पत्रकार काका नरवणे, हनिफभाई शहा , देवगाव चे खुदाभाई शेख,कारभारी गोर्डे,उद्योजक वसंत गरड तरवडीचे सरपंच जालिंदर तुपे ,उपसरपंच दत्तात्रय भारस्कर, माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने ,मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मुसा भाई इनामदार ,इकबाल इनामदार, सलीम इनामदार, मनसे अध्यक्ष विलास देशमुख, किशोर थोरे, सुदर्शन घोदेचोर, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल ,पोलीस नाईक नितीन भताने, पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे,पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे ,होमगार्ड मस्के, मोहिते ,बबलू चव्हाण वआदी सह कुकाणा परिसरातील विवीध संघटनेने पदाधिकारी, एकता पत्रकार संघाचे पदाधिकारी, कुकाणा ग्रामपंचायती चे पदाधिकारी व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुकाण्याचे विद्यमान उपसरपंच सोमनाथ कचरे यांनी मानले.