महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 प्रदर्शनामध्ये सहभाग .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 प्रदर्शनामध्ये सहभाग .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 प्रदर्शनामध्ये सहभाग*

*राहुरी विद्यापीठ, दि. 28 मार्च, 2023*

 शिर्डी येथे दि. 24 ते 26 मार्च, 2023 या कालावधीत महापशुधन एक्स्पो 2023 या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रदर्शनात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठाचे प्रदर्शन दालन मांडण्यात आले होते. या दालनामध्ये लुसर्न, बरसिम, ओट, मका व संकरीत नेपीअर या वाणांचे सजीव नमुने व देशी गाय उत्पादने शेतकर्यांना पाहण्यासाठी मांडण्यात आले होते. त्याचप्रमाणे देशी गाय संशोधन प्रकल्प, पुणे यांच्यातर्फे देशी गायीचे दुग्ध उत्पादन, विविध उत्पादने प्रमुख्याने गांडुळखत, शेणापासून गणपती मुर्ती, पणत्या व इतर उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षणाबद्दल माहिती देण्यात आली. या प्रदर्शन दालनास कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व नागपूर येथील माफसू विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख व पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सत्येंद्रप्रकाश सिंग यांनी भेट देवून शास्त्रज्ञांना प्रोत्साहीत केले. यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी मान्यवरांना माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांनी तसेच विविध अधिकारी व शेतकर्यांनी विद्यापीठाने प्रसारीत केलेले वाण व तंत्रज्ञानाची माहिती घेतली. प्रदर्शन दालनामध्ये कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. ए.व्ही. अत्तार, डॉ. जी.के. वामन, डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे व श्री. नवनाथ दराडे यांनी प्रदर्शन कालावधीत दालनास भेट देणार्या मान्यवर तसेच शेतकर्यांना माहिती दिली.