बालाजी देडगाव येथे आ. शंकरराव गडाख यांच्या ७१लक्ष खर्चाच्या विविध कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण ) आज दि.20 रोजी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून 71 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मा.सभापती सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते पार पडला.
प्रथमतः हनुमान मंदिर येथील ६ लक्ष रुपये खर्चाचे पेव्हिग ब्लॉग या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला .हा कार्यक्रम हनुमान मंदिर येथे घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे होते. तर या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे ,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे ,पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होडे, महेश निकम, इंजिनीयर देशमुख साहेब प्रमूख मान्यवर लाभले. यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी प्रास्ताविक केले तर बाळासाहेब सोनवणे ,अजित मुरकुटे, योगेश होंडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी सुनीता ताई गडाख यांनी विविध विकास कामाबद्दल माहिती देत देडगाव नेहमी माझ्या पाठीशी उभे राहते व नामदार शंकरराव गडाख हे कायम आपल्या सेवेसाठी तत्पर राहतील या शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर 10 लक्ष रुपये खर्चाचा रेणुका देवी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण या रस्त्याचे लोकार्पण सोहळा पार पडला देवस्थानच्या वतीने ही प्रमुख मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर 25 लक्ष रुपये खर्चाचा देडगाव ते शहापूर वांढेकर ,चेडे ,दळवी, कुटे,वस्ती खडीकरण करणे या रस्त्यांचाही लोकार्पण करण्यात आला.
नंतर 30लक्ष रुपये खर्चाचा देडगाव येथील तांबे, औटी, वस्ती काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. विकास कामामुळे देडगाव चा विकास निश्चित झाला असून नामदार शंकरराव गडाख कुटुंबाचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
यावेळी माजी उपसभापती कारभारी चेडे ,माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, प्रगतशील बागातदार चंद्रभान कदम,माजी चेअरमन लक्ष्मणराव बनसोडे ,बाबासाहेब मुंगसे , बालाजी पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके,महादेव मुंगसे , अड गोकुळ भताने ,निवृत्ती मुंगसे, सोसायटी संचालक संजय मुंगसे मा .चेअरमन अरूण बनसोडे, व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, उप शिवाजी काजळे ,गणेश औटी, दिलदार सय्यद ,
माजी सरपंच रामेश्वर गोयकर , चेअरमन योसेफ हिवाळे, कडू भाऊ दळवी ,माजी सरपंच जालूनाना चांदघोडे ,विकास राजळे ,गणेश लोंढे, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे ,विश्वस्त सुभाष मुंगसे, किशोर वांढेकर, बजरंग दलाचे सर्व सदस्य विविध शाखेचे ,संघटनेचे पदाधिकारी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थ व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य अशोकराव मुंगसे यांनी मा
नले.