शिवांकुर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी,विद्यार्थ्यांनी केले आई-वडील व शिक्षकांचे पूजन .
*शिवांकुर विद्यालयात गुरुपौर्णिमा मातृ-पितृ, शिक्षक पूजनाने उत्साहात साजरी*
शिवांकुर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून विद्यालयात मातृ-पितृ पूजन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
*प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो आई वडील जीवनातील पहिले गुरू असतात. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी गोरक्षनाथ औटीसर यांनी केले* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दंतरोग तज्ञ डॉ. प्रतीक चौहान हे होते.
गुरुपौर्णिमा उत्साहात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. मातृ-पितृ पूजनासाठी विद्यालयांमध्ये बहुसंख्य पालक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या गुरुंविषयी आपले मनोगते व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी महर्षी व्यास ऋषी मुनिंची वेशभूषा साकारली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील पहिले गुरू आपले आई-वडील यांचे भक्तिमय वातावरणात पूजन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, खजिनदार डॉ. किशोर पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, मंगलताई पवार, युवराज पवार यांची मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे व आभार भाऊसाहेब करपे यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार, मुख्याध्यापिका छाया जाधव मॅडम, पर्यवेक्षक अरुण खिलारी सर, किरण तारडे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक अमोल गाडे, अर्चना पाळंदे शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक उपस्थित होते...