खेडले परमानंद येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व मच्छिंद्र रामदास बनकर यांचे दुःखद निधन.

खेडले परमानंद प्रतिनिधी
खेडले परमानंद येथील मच्छिंद्र रामदास बनकर यांचे वयाच्या 53 व्या वर्षी अकाली निधन झाल्यामुळे बनकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मच्छिंद्र बनकर यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई ,दोन मोठे भाऊ , एक मुलगा , दोन मुली पत्नी सुनबाई असा मच्छिंद्र बनकर यांचा परिवार.
29 नोव्हेंबर रोजी सकाळी खेडले परमानंद येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.