राजकीय वर्तुळात परिवर्तनाची राज्यासह देशाला गरज.वामण मेश्राम.

राजकीय वर्तुळात परिवर्तनाची राज्यासह देशाला गरज.वामण मेश्राम.

राजकीय परिवर्तनाची देशासह राज्याला गरज: वामन मेश्राम

राहुरी : देशासह राज्याला राजकीय परिवर्तनाची गरज असून गेल्या अनेक वर्षापासून सत्ता एका विशिष्ट वर्गाच्या हाती असून आलटून पालटून हेच लोक सत्तेचा उपभोग घेत आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतरही देशांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त, ओबीसी, मराठा व धर्मपरावर्तित अल्पसंख्याक समाजावर अन्याय अत्याचार स्वतंत्र भारतात सुरू आहे. स्वातंत्र्यपूर्ण पूर्वकाळात जो समाज सुखी संपन्न होता आज त्या समाजावर मागण्याची वेळ आली आहे. हे थांबवायचे असेल तर सर्व समाजाने एका विचाराने प्रेरित होऊन देशासह राज्यात येणाऱ्या काळात राजकीय परिवर्तन करणे गरजेचे आहे. राहुरी येथे सोमवारी (दि. ०९) आयोजित परिवर्तन यात्रेच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक वामन मेश्राम हे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष इमरान देशमुख, शिरीषराव गायकवाड, गौसभाई सय्यद, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजकुमार आघाव. लहुजी क्रांती सेनेचे अध्यक्ष कांतीलाल जगधने यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अगोदर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रॅलीचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतीषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती पासून गाडगेबाबा आश्रम शाळेपर्यंत यावेळी पायी रॅली काढण्यात आली.

या कार्यक्रमासाठी भास्कर रणनवरे, शिवाजीराव भोसले, गणपत मोरे, रावसाहेब काळे, सुनिताताई पवार, संदीप थोपटे, राजूनाना जाधव, राहुल तमनर, इमरान सय्यद,बाळासाहेब जाधव भाऊसाहेब कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर सातुरे, युवराज पारडे, रवी पवार, डॉ.रमेश गायकवाड, अक्षय भालेराव, जगदीश भालेराव, मच्छिंद्र पवार, नारायण शिंदे, फिरोज शेख, साहिल शेख, विजय पवार, प्रकाश ओहोळ, राजेंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी केले तर आभार फिरोज शेख यांनी मानले.