आ प्राजक्त तनपुरे यांनी शेतक-यांची दिशाभुल न करता प्रसाद शुगरचे 500 रु प्रतीटन प्रेमेन्ट त्वरीत करावे-सुरेशराव लांबे पाटील .

आ प्राजक्त तनपुरे यांनी शेतक-यांची दिशाभुल न करता प्रसाद शुगरचे 500 रु प्रतीटन प्रेमेन्ट त्वरीत करावे-सुरेशराव लांबे पाटील .

 राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार यांनी दोन दिवसा पुर्वी मतदारसंघातील शेतक-यांच्या मुलांना बरोबर घेऊन सायकल यांत्रा काढुन महाविकास आघाडी सरकारमंधे आपन मंजुर केलेली कामे नविन शिंदे व फडणवीस सरकारने स्थगीत केली याचा निषेद केला व पिक विमा कंपनीअधिका-यांना फोन करुन शेतक- यांना जास्त नुसकान भरपाईत द्या प्रशासकीय अधिका-यांना पुन्हा पंचनामे करा शासना कडुन नुसकान भरपाई मागणी करुन शेतक-यांची दिवाळी फक्त भाषनातुन गोड करनारे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शेतक-यांची व त्याच्या कुटुबांची दिशाभुल न करता,वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याचे मागील अनेक हंगामाचे ईतर कारखान्या प्रमाणे व सन 2021/22 च्या हंगमात गाळप झालेल्या ऊसाला किमान 500 रु.प्रतीटन फायनल प्रेमेंन्ट त्वरीत करुन शेतक-यांची दिवाळी गोड करावी अंन्यथा येणा-या काळात ऊस उत्पादक शेतकरी तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवतील असा सुचक ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला,

लांबे पाटील यांनी पुढे बोलताना सांगीतले गेली दोन तीन वर्षा पासुन कोरोना लाॅकडाऊन अतिवृष्टी या सर्व आस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हैराण झाला त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली, त्यातच चालु वर्षी सततची अतिवृष्टी मुळे व परतीच्या अति पावसाने खरीपातील संपुर्ण पिके उपळुन गेली सप्टेंबर महीन्यात पंचनामे करुनही अद्यापही शेतक-यांना नुसकान भरपाई मिळालेली नाही तशातच शेतक-यांचे मुख्य पिक असलेल्या ऊसाला 21/22 च्या गळीतास आलेल्या ऊसाला कोल्हापुर सांगली सातारा पुणे या जिल्यांतील कारखानदारांनी ऊसाला प्रतीटन 3 हजार भाव दिला,व नगर जिल्यांतील काही कारखान्यांनी 2500 ते 2700 पर्यत भाव दिला,दौंड शुगर कारखान्याने राहुरीतुन 130 कि.मी.वहातुक करुन ऊस उत्पादकांना 2925 रु.व संगमनेर कारखान्याने राहुरीतुन 100 कि.मी.वहातुक करुन 2666 भाव दिवाळी पुर्वीच आठ दिवस आधी ऊस उत्पदक शेतक-यांना दिला,

मात्र राहुरी वांबोरी येथील आ प्राजक्त तनपुरे यांचा असलेला प्रसाद शुगर कारखान्याने सन 2021/22/हंगामास आलेलेल्या ऊसाला पहीले प्रेमेंट 2150 देऊन त्यातुनही 10रु कपात केले,प्रसाद शुगर कारखाना व्यवस्थापन स्थापनेपासुन पहीले एकच प्रेमेन्ट करुन शेतक-यांची मोठ्या प्रमानात लुट करत आहे,

प्रसाद शुगर कारखान्याने सन 2019/20 व 2020/21थकीत प्रेमेंट संगमनेर,संजीवनी,कोळपेवाडी या कारखान्या प्रमाणे देऊन,सन 2021/22/या हंगामास गाळप झालेल्या ऊसाला प्रसाद शुगर व डाॅ बा.बा.तनपुरे स.सा.कारखान्याने आणखी 500 रु प्रमाणे प्रेमेन्ट करुन ईतर कारखान्या प्रमाणे 2650 भाव पुर्ण करावा अन्यथा सर्व उस उत्पादक शेतक-यांना बरोबर घेऊन साखर आयुक्त कार्यलयावर भव्य मोर्चा नेऊन चालु गळीत हंगाम सन 2022/23/ चा क्रेंसिग परवाना रद्द करु असा ईशारा प्रहार जन शक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला,