खा . संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राहुरी तालुका शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे याची निवेदनाद्वारे मागणी .
खा.संजय राऊत याच्यावर गुन्हा दाखल करा. – देवेंद्र लांबे
– गुरुवार दि.२३ रोजी राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने राहुरी पोलिस स्टेशन येथे उप . पोलिस निरीक्षक सज्जन न-हेडा यांना निवेदन देवून खा. संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी केली आहे.यावेळी शिवसेना राहुरी ता.संघटक अशोक तनपुरे,शेतकरी आ.प्रमुख किशोर मोरे उपस्थित होते.
दिलेल्या पत्रात म्हंटले आहे कि,संजय राऊत हे खासदार असून सामना वृत्तपत्राचे संपादक आहेत. सदर श्री संजय राऊत यांनी दिनांक २०.०२.२०२३ रोजी प्रसार माध्यमांना मुलाखत देऊन त्यामध्ये हिंदी भाषेमध्ये पुढील प्रमाणे वक्तव्य केलेले आहे. “श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत को खतम करने की एक सुपारी जिसे बोलते है कॉन्ट्रॅक्ट किलिंग, एक माफिया जो अभी अभी जमानत पे छुटा है, राजा ठाकूर उनका नाम है, उनको ये कॉन्ट्रॅक्ट किलिंग का काम दिया है, यह मेरी जानकारी है, तो मेरा यह कर्तव्य बनता है, इस राज्य के बुद्धिमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मुंबई के पोलीस कमिशनर, ठाणा के पोलीस कमिशनर, को यह अवगत करे. अशा प्रकारची मुलाखती त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिल्या. तसेच तदनंतर श्री.संजय राऊत यांनी यासंदर्भात लिखित तक्रारी अर्ज पोलिसांकडे सादर केला. श्री संजय राऊत यांनी सदरचा खोटा अर्ज त्यांचे राजकीय व वैयक्तिक स्वार्थापोटी प्रसिद्धी मिळवण्या कामी केलेला आहे.
श्री.संजय राऊत यांनी आमचे शिवसेना पक्षाचे श्रीकांत शिंदे लोकसभेचे खासदार असून त्यांचे वर आत्तापर्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप कधीही झालेले नाही. विरोधात बदनामीकारक शब्दांचा वापर करून आमच्या पक्षातील नेते ,कार्यकर्ते ,लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण केली आहे. त्यामुळे मी स्वतः व माझ्यासारखे इतर कार्यकारी उदिग्न झाले आहोत.श्री.संजय राऊत यांनी सदरची मुलाखत व खोटा तक्रारी अर्ज देऊन राजकीय पक्ष व लोकांमध्ये द्वेष, भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्व कृत्य केलेले आहे. तरी आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत जाणीवपूर्वक खोटे आरोप करून बदनामी कारक व द्वेष कारक बातमी पसरवून समाजामध्ये द्वेषाची भावना तेढ वैमानस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्व कृत्य केलेले आहे.
त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या प्रसंगी राजेंद्र लबडे,प्रभाकर तुपे,किशोर सोनवने,औदुंबर करपे,रणजीत चव्हाण आदी उपस्थित होते.