कृषी महाविद्यालय सोनईला चला हवा येवू द्या फेम सागर करांडे यांची सदिच्छा भेट.

कृषी महाविद्यालय सोनईला चला हवा येवू द्या फेम सागर करांडे यांची सदिच्छा भेट.

सोनई:(प्रतिनिधी) मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय सोनईला 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडे यांनी सदिच्छा भेट दिली.त्यांच्यासमवेत चला हवा येऊ द्या चे सहकलाकार अभिजित बारहाते हे होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे यांनी साहित्यिक यशवंतराव गडाख यांची पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान केला. महाविद्यालयात असलेल्या वेगवेगळ्या सुविधांची तसेच चतुर्थ वर्गाचे विद्यार्थी स्वतः राबवीत असलेल्या कौशल्यपूर्ण प्रायोगिक शिक्षण अनुभव कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या,वनस्पती विकृतीशास्त्र, मृदशास्त्र,वनस्पतीशास्त्र,कृषिविद्या,दुग्धशास्त्र,कीटकशास्त्र, कृषिअभियांत्रिकी,कृषिविस्तार शिक्षण,कृषि अर्थशास्त्र इ. विभागाची सर्व माहिती प्राचार्य डॉ.हरी मोरे यांनी दिली.यावेळी याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. संदिप तांबे,प्रा.सचिन गायकवाड,प्रा. अनुप दरंदले,सुरक्षा अधिकारी सुधीर शेटे,प्रा.नरेंद्र दहातोंडे, प्रा.प्रियदर्शनी जाधव,प्रा.प्रांजल शेडगे,प्रा.श्रीकृष्ण हुरुळे,प्रा.दिपाली कदम,प्रा. शुभदा पलघडमल,प्रा.देशमुख,प्रा.कानडे,डॉ. गाडेकर,ग्रंथपाल प्रसाद गडकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी श्री कारंडे यांनी संस्थेचे संस्थापक मा.खा.साहित्यिक यशवंतराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख,उपाध्यक्ष उदयन गडाख यांचे आणि मुळा एज्युकेशनचे भरभरून कौतुक केले.

फोटोओळी...

सागर कारंडे यांचा कृषि महाविद्यालयाच्या वतीने साहित्यिक यशवंतराव गडाख यांची पुस्तके भेट देऊन सन्मान करतांना प्राचार्य डॉ. हरी मोरे,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.संदिप तांबे,प्रा.सचिन गायकवाड, प्रा. श्रीकृष्ण हुरुळे 

छाया:(अमोल तोगे, सोनई)

बी पी एस न्युज नेवासा तालुका प्रतिनिधी

युनूस पठाण