जबरी चोरी करणारा आरोपी मुद्देमला सहित अटक,राहुरी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई .

जबरी चोरी करणारा आरोपी मुद्देमला सहित अटक,राहुरी पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई .

        राहुरी तालुक्यातील माहेगाव येथील महिला झुंबरबाई नारायण खोसे (वय 62 ) या राहुरीच्या बस स्टॅन्ड वरून माहेगाव येथे रिक्षामध्ये बसून निघाल्या होत्या .रिक्षातील रिक्षा चालक याने सदर महिलेला माहेगाव येथे न नेता राहुरी कॉलेज रोडने घेऊन जाऊन काटवणात रिक्षा उभी करून त्यांच्याकडील रोख रक्कम व चांदीचे दागिने असे एकूण 4000 रु .किमतीचा ऐवज लुटून नेला .या महिलेने दिनांक 07/06/2023 रोजी घडलेल्या घटनेबद्दल राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता .

 

        अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री .राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री .रामचंद्र करपे यांना कारवाई करण्यासाठी आदेशित केले होते .वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आरोपीला पकडण्यासाठी वेळोवेळी नाकाबंदी व गस्त घालण्याचे काम करण्यात आले होते तसेच संशयित आरोपी मोकाट फिरताना दिसल्यास राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले होते .

 

         वरील आवाहनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे यांना माहिती मिळाली की राहुरी खुर्द येथे एक आरोपी रिक्षासह फिरत आहे .वेळेचा विलंब न करता करपे यांनी सपोनि राजेंद्र लोखंडे,पोलीस कॉन्स्टेबल दीपक फुंदे, सचिन ताजने, आजिनाथ पाखरे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख यांना बरोबर घेऊन राहुरी खुर्द येथे सापळा लावून आरोपी रवींद्र सुभाष पाटील वय 32 राहणार इरिगेशन कॉलनी राहुरी खुर्द यास रिक्षासह ताब्यात घेतले .आरोपीस राहुरी पोलीस स्टेशन येथे आणले असता व विचारपूस केले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे .त्याच्याकडील चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून भादवी कलम 216/2023 भादवि कलम 457,380 प्रमाणे राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

         सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीसांनी केली आहे .कोणालाही संशयित आरोपी किंवा विना नंबर प्लेट मोटर सायकल आढळून आल्यास तात्काळ 02426232433 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन राहुरी पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे .