केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या संचालकांची कृषी विद्यापीठातील मेंढी सुधार प्रकल्पास भेट .

केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या संचालकांची कृषी विद्यापीठातील मेंढी सुधार प्रकल्पास भेट .

*केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या संचालकांची कृषि विद्यापीठातील मेंढी सुधार प्रकल्पास भेट*

*राहुरी विद्यापीठ, दि. 9 जून, 2023*

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या आर्थिक सहाय्याने व कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित असलेल्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पास राजस्थान अविकानगर येथील केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. अरुण कुमार यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकल्पाने मेंढपाळांच्या कळपांमध्ये पुरवलेल्या सुधारीत नर मेंढयांव्दारे पैदास झालेल्या मेंढयांची पाहणी करुन मेंढी पालक शेतकर्यांसोबत संवाद साधला. तसेच त्यांनी सुधारीत मेंढी पालन तंत्रज्ञानाबाबत त्यांना मार्गदर्शन केले. किफायतशीर मेंढीपालन होण्याकरीता प्रकल्पाव्दारे मेंढपाळांना सुधारीत नर मेंढयाचे वाटप डॉ. अरुण कुमार यांचे हस्ते करण्यात आले. मेंढीपालक शेतकर्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश कांदळकर व त्यांचे सहकारी करत आहे असे डॉ. अरुण कुमार यांनी गौरव उद्गार काढले. 

           याप्रंसगी केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विनोद कदम,शेळी सुधार प्रकल्पाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले, गो-संशोधन प्रकल्पाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विष्णु नरवडे व सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश कांदळकर उपस्थित होते. हा भेटीचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता श्री. प्रमोद जाधव, श्री. सतिष काळे, श्री. भैय्यासाहेब चौधरी, श्री. स्वप्निल गायकवाड, श्री. संदिप पवार व श्री. रमेश कल्हापुरे यांनी परिश्रम घेतले.