श्री. संत नागेबाबा परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षमित्र पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
बालाजी देडगाव (
प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह शाखा देडगाव च्या वतीने परिसरातील शाळेतील दहावी व बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व नागेबाबा वृक्षमित्र वितरण सोहळा पार पडला.
नागेबाबा शाखा ही वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारीत असून या नागेबाबा परिवार सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहे .चांगल्या कामाची दखल घेत नेहमी चांगल्या कर्तुत्वाचा सन्मान ही संस्था करत असते .म्हणून देडगाव परिसरातील शाळेतील दहावी व बारावी मध्ये सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व नागेबाबा परिवाराने जी योजना चालू केली आहे. उत्तम वृक्षारोपण करून झाडाची बारा महिने निगा करुन संगोपन करणाऱ्याला या संस्थेमार्फत वृक्षमित्र हा पुरस्कार दिला जातो. म्हणून नेवासा खरेदी विक्री संघाचे मा. संचालक कडूभाऊ तांबे ,सुनील साबळे, आनंदा दळवी यांना वृक्षमित्र पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे मा.उपसभापती कारभारी चेडे ,बालाजी देवस्थानचे मा. अध्यक्ष कुंडलिक दादा कदम, मा. उपसरपंच दत्ता पाटील मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे ,सोन्या चांदीचे व्यापारी भागवत दीक्षित , शंकर गोयकर सर,विलासराव मुंगसे ,ज्ञानेश्वर मुंगसे. ,मच्छिंद्र मुंगसे ,नवनाथ मुंगसे ,रामचंद्र जाधव ,बाबासाहेब तांबे, पत्रकार युनूस पठाण शाळेतील गुणवंत विद्यार्थी व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेबाबा संस्थेचे शाखाधिकारी पांडुरंग एडके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कॅशियर शिल्पाताई बनसोडे यांनी मानले.