आज कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा आंदोलनाला ३३ दिवस झाले तरी आजही सरकारने कृषि अभियंत्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही.
कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या...
१. स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे.
२. मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषि अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी.
मध्यप्रदेश राज्यात दिनांक १७/१०/२०२२ रोजी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन होते. कर्नाटक राज्यात कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार???
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषि विद्यापीठात कृषि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार शेतीच्या आधुनिकीकरणासाठी स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन केले आहे तसे महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे यासाठी गेली ३३ दिवसांपासून धरणे/साखळी पद्धतीने उपोषण करत आहेत आजही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. विद्यार्थ्यांची विनंती आहे लवकरात लवकर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करावी व कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
तसेच इतर राज्यात (मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिस, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय) मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखा व स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समतुल्य आहेत तर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यां पात्र का नाही? कृषि अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषि अभियंते करत आहेत तरी सरकारने अद्याप या आंदोलनाची दखल घेतली नाही. सरकारने लवकरात लवकर कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.