नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे आई बहिणीवर शिवी देणाऱ्यावर कारवाई सुरू.
शिवी दिल्याने सौंदाळा ग्रामपंचायतने केला ५०० रु दंड
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण ) :- दि, २८/११/२०२४ शुक्रवार रोजी झालेल्या ग्रामसभा ठराव अन्वये शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड ठरविण्यात आला होता त्यानंतर दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले
सौंदाळा गावचा शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्याचा ठराव सोशल मिडिया व वर्तमान पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे त्यानंतर ग्रामपंचायतने केलेल्या दंडास महत्व प्राप्त झालं आहे
सौंदाळा गावातील काल शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे
यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या सकाळी सरपंच शरदराव आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे करण्याचे सांगून वाद मिटवला
यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांध भाऊ म्हणुन गोडीगुलाबीने राहण्याचे सांगितले
दंड भरून यापुढे शिवीगाळकरणार नसल्याचे ठकाजी व शांताराम यांनी म्हंटले आहे
यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधित भरणार असुन सदरच्या रकमेतुन शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे म्हणुन फ्लेक्स बोर्ड डकवणार असल्याचे सांगितले