नांदूर ममदापुर शिवरस्त्याची दुरावस्था; अपघाताच्या प्रमाणात वाढ सरपंचाचे दुर्लक्ष.

नांदूर ममदापुर शिवरस्त्याची दुरावस्था; अपघाताच्या प्रमाणात वाढ सरपंचाचे दुर्लक्ष.

नांदूर ममदापुर शिवरस्त्याची दुरावस्था; अपघाताच्या प्रमाणात वाढ सरपंचाचे दुर्लक्ष.

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे ९३७०३२८९४४.

राहाता तालुक्यातील नांदूर ममदापुर शिवरस्त्याची दुरावस्था होऊन या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने शेतकरी, शालेय विद्यार्थी, दूध उत्पदक , उस उत्पादक, शेतकरी असे रोज शेकडो शेतकरी या रस्त्याने ये -जा करत असतात.
खड्डे मोठे असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत ला वारंवार निवेदन व माहिती देऊनही ग्रामपंचायत जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे.
गेल्या काही दिवांपासून पाऊसाचे प्रमाणा वाढल्याने मोठ्या प्रमाणात अपघात देखील झाले आहे.
ग्रामपंचायत नांदूर यांना दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी निवेदन देखील दिले होते, परंतु निवेदन देऊन दीड महिना पूर्ण झाला असून, देखील कोणतीही दखल घेतली नाही..
सदर रस्ता नांदूर-ममदापुर शिवरस्ता म्हणजेच यादवमळा ते चांडेवाडी असे या रस्त्याचे वर्गीकरण आहे.
परंतु या रस्त्यावर यादवमळा बस स्थानक ते जगताप, कदम वस्ती 200 मी. पर्यंत जूने डांबरीकरण असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहे. रस्त्यावर मुरूम टाकावा यासाठी कोणाचीही अडचण नसताना ग्रामपंचायत नांदूर मुद्दामून या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे.
नांदूर ग्रामपंचायत व सरपंच सौ.प्रीतम गोरे यांना विनंती आहे की, कोणतेही कारण न देता आपण नांदूर ममदापुर शिवरस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करून नागरिकांना सहकार्य करावे, अशी मागणी नागरिकांमधून होतांना दिसत आहे, अन्यथा काही ग्रामस्थ पालकमंत्री यांना निवेदन देणार असून, ग्रामपंचायत समोर उपोषणाचा इशारा देखील दिला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे..