जखमी हरणाचे वाचवले प्राण - पिंप्री अवघडच्या तरुणांचे कार्य महान, पुढील उपचारासाठी वनविभागाच्या केले स्वाधिन .

जखमी हरणाचे वाचवले प्राण - पिंप्री अवघडच्या तरुणांचे कार्य महान, पुढील उपचारासाठी वनविभागाच्या केले स्वाधिन .

              अतिशय कडक उन्हाळ्यामुळे वनचर प्राणी अन्न पाण्यासाठी भटकंती करत असून अन्न पाण्याच्या शोधात त्यांचा जीव धोक्यात येत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत . मागील काही दिवसापूर्वी शनिशिंगणापूर फाट्या नजीक विद्यापीठ प्रक्षेत्रामध्ये अपघातग्रस्त बिबट्याला पकडण्यात आले होते असाच प्रकार आज पिंप्री अवघड परिसरामध्ये एका हरणाच्या बाबतीत घडला असून त्यास वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे .

 

           पिंप्री अवघड परिसरातील कोंढवड फाटा येथे एक हरीण रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडले होते .तेथील रहिवासी असणारे तसेच पिंप्री अवघडचे माजी उपसरपंच दत्तात्रय बाचकर व रामभाऊ होडगर यांनी जखमी हरणास रस्त्यावरून उचलून बाजूला घेऊन त्याचे प्राण वाचवले . या घटनेची तत्परतेने दखल घेऊन त्यांनी वनविभाग अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेली घटना कळवली असता वन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी हरणास पुढील उपचारासाठी तात्काळ राहुरी येथे घेऊन गेले आहे.

 

         जखमी हरणाचे प्राण वाचवण्यासाठी कोंढवड फाटा येथील सहकार्य करणाऱ्या सर्व तरुणांचे पिंप्री अवघड ग्रामस्थांनी विशेष कौतूक केले आहे .