बालाजी देडगाव येथे चंपाषष्ठी सोहळा रामगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने मोठ्या उत्साहात साजरा.
बालाजी देडगाव :- ( प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व सदाशिव महाराज पुंड यांच्या अधिपत्याखाली व बाळ देवा तांदळे यांच्या आशीर्वादाने चंपाषष्ठी सोहळा ह भ प रामगिरी महाराज खरवंडीकर यांच्या मधुर वाणीतून कीर्तनाने व विविध धार्मिक कार्यक्रमाने पार पडला.
गेल्या सहा दिवसापासून शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी प्रस्तुत सुखदेव वाहूरवाघ वाघे यांच्या अधिपत्याखाली विविध नामांकित जागरण गोंधळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दररोज आरतीचेही नियोजन करण्यात आले होते .या सोहळ्या दरम्यान तालुका भरातून लोक दर्शनासाठी येत होते. देडगावचा खंडेराया परिसरात प्रसिद्ध असून नवसाला खंडेराया पावतो अशी भाविकांच्या मनात श्रद्धा आहे म्हणून भाविकांची मांदियाळी लाभली.
या निमित्ताने सोहळ्यानिमित्ताने गावभर फटाक्याच्या आतषबाजी मध्ये , पारंपारिक वाद्यामध्ये व शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी यांच्या मल्हार जागरण गोंधळाने मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. तर खंडेरायाची पालखी सजावटीने मिरवणुकीचे आकर्षण बनले होते. तर गावभर महिलांनी या पालखीचे मनसोक्त दर्शन घेतले व गावभर या पालखीचे स्वागत करण्यात आले.
तर या सोहळ्याची सांगता ह भ प रामगिरी महाराज खरवंडीकर यांच्या मधुर वाणीतून सुरेख किर्तन करण्यात आले .तर या कीर्तनाने व जय हरीच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता .व बालाजी भजनी मंडळ यांनी विशेष कीर्तनासाठी सहकार्य केले. तर दररोज व काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त आसाराम कुटे, रामूनाना मुंगसे ,भाऊराव चेमटे ,अरुण मुंगसे ,राजीव गायकवाड ,भिमाजी पुंड, दत्तोबा भगत, बाळासाहेब कुटे यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले. तर दररोजचा प्रसाद हरिभाऊ म्हस्के, सोन्या बाप्पू मुंगसे, दादासाहेब पळसकर ,सोमनाथ मेजर मुंगसे ,रावसाहेब मुंगसे, सिताराम कुटे ,तर काल्याची पंगत श्रीमंत पुंड यांनी दिली. तर लाईट डेकोरेशन चे नियोजन दत्त मंदिर मित्र मंडळ यांनी केले होते.
या सोहळ्यानिमित्त समस्त ग्रामस्थ व बालाजी भजनी मंडळाचे नवनाथ महाराज मुंगसे, हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज रक्ताटे ,मृदुंग वादक म्ह, वसंत नांगरे, विनायक माळवदे, शिवाजीराव तांबे ,संभाजीराव कदम ,गंगाधर कदम ,सुभाषराव मुंगसे , यांनी सोहळ्याची शोभा वाढवली.