बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन :- प्राचार्य संजय चेमटे
बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन-प्राचार्य संजय चेमटे
ग्रामीण प्रतिनिधी,
भारत भालेराव
आव्हाणे बु: व्याकरणाच्या दृष्टीने संधी केली तर रक्षा अधिक बंधन असते होते तर आपल्या भावाकडून रक्षण होण्याचे वचन घेणे आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा अर्थात बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण आहे ज्याला पौराणिक महत्व असून दर श्रावण पौर्णिमेला आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य श्री.संजय चेमटे यांनी रक्षाबंधन कार्यक्रम प्रसंगी केले.
ढोरजळगाव येथील श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षाना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख पाहुण्या सौ शैलजा मुथ्था यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या विद्यालयातील वृक्षांना तसेच विद्यालयातील विद्यार्थ्याना सर्व विद्यार्थ्यीनींनी राख्या बांधल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ.सातपुते मॅडम यांनी आपल्या मनोगतात भारतीय संस्कृतीतील पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेला व बहिण भावाच्या नात्यात दृढता निर्माण करणारा हा सण आहे या सणाचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व विविध उदाहरणे देत समजावून सांगितले व आपल्या बहिणीचे जसे आपण संरक्षण करतो तसे सर्व स्त्रियांचा आदर करून सरंक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे असे मत मांडले.
कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यीनी श्रद्धा ससाणे,मयुरी खोसे,हर्षदा वाकडे यांनी तर शिक्षक मनोगतात श्रीम.देशमुख मॅडम यांनी रक्षाबंधन सणाची माहीती उपस्थितांना सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.अमोल भालसिंग यांनी तर सुत्रसंचालन श्रीम.रत्नमाला फलके यांनी केले.श्री.सुदाम काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री सुनील जायभाये व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते....