नगर शिर्डी महामार्गावरील जड वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करा - देवेंद्र लांबे पा

नगर शिर्डी महामार्गावरील जड वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करा - देवेंद्र लांबे पा

नगर शिर्डी महामार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करा. – देवेंद्र लांबे पा

राहुरी ता प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

.

(राहुरी प्रतिनिधी) – नगर शिर्डी महामार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात यावी अशी मागणी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे पा. यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 देवेंद्र लांबे यांनी म्हंटले आहे कि, अहिल्यानगर ( विळद घाट) ते शिर्डी ( सावळीविहीर) महामार्गचे (NH-160) काम चालू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. एकेरी वाहतुकीमुळे रहदारीस मोठ्याप्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यात नाताळ सणाच्या सुट्यानंमुळे शिर्डी व शिंगणापूर येथे दर्शना साठी देश विदेशातून भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे एकेरी वाहतुकीमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्याच बरोबर याच (NH-160) महामार्गांवर अवजड वाहतूक सुरु ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      एकेरी वाहतुकीमुळे आत्तापर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण अपघातात गेलेले आहे. मागील काही दिवसांमध्ये देखील एकेरी वाहतुकीमुळे रस्ता अपघातात अनेक प्रवासी मृत्युमुखी पडलेत तर काहींना गंभीर स्वरूपाचे दुखापत झालेली आहे.

  नगर- शिर्डी रस्ता जोपर्यंत दुहेरी वाहतुकीस चालू होत नाही,तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अवजड वाहनांचा मार्ग बदलून नगर शिर्डी महामार्गांवर अवजड वाहतुक बंद करावी.

   दिलेल्या पत्राची नोंद न घेतल्यास नगर ते शिर्डी या महामार्गांवर(NH-160) अवजड वाहणांमुळे कोणतीही जीवित हानी झाल्यास की कोणत्याही प्रवशाला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास संबंधित प्रशासनाला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करून अपघात ग्रस्त प्रवाशांना न्याय मिळवून देणे कामी सहकार्य करावे अशी मागणी श्री.लाबे पा.यांनी केली आहे.

 

(चौकट – नगर शिर्डी महामार्गावर दीड महिन्यांपूर्वी राहुरी परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनानंतर खड्डे बुजविणे अपेक्षित होते परंतु राहुरी खुर्द ते राहुरी परिसरात एका बाजूने मोकळी खडी टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य राहुरी परिसरात निर्माण झाले आहे.या धुळीमुळे नागरिकांना व लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाका

रता येत नाही.)