ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 98 व्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध
राहुरी ता प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे
*ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 98 व्या मुलीचा राहुरी पोलीस स्टेशन कडून शोध*
*आरोपीने यापूर्वीही केले होते अल्पवयीन मुलीवर अपहरण व लैंगिक अत्याचार*
*मागच्या गुन्ह्यात होता अडीच महिने जेलमध्ये*
राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी हिस दि. 18/2/2025 रोजी अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले बाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 18/2/2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 129/2025 बी एन एस कलम 137 (2), 87 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेण्यात आला असून पीडित मुलीचा तिचे पालकांसमक्ष जबाब नोंद करण्यात आलेला असून पीडित मुलीला बालकल्याण समिती यांच्याकडे पाठविण्यात आलेले आहे. सदर कारवाई दरम्यान *पीडित मुलीने स्वतःला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याने तिला वाचवतांना आरोपीने तेथून पलायन केले.* Pravin आरोपी याचा वर यापूर्वी देखील *अपहरण तथा लैंगिक अत्याचाराचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल* आहेत. प्रवीण बाबासाहेब कोहकडे वय 21 वर्षे रा.मोमीन आखाडा ता. राहुरी गुन्ह्यात *यापूर्वी 2 आरोपी दि. 18/03/2025 रोजी अटक करण्यात आलेले आ* हेत. आरोपी याचा गोपनीय माहितगार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चालू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील मोबाईल सेल चे पोका/धनाड तसेच पोका/ दरेकर यांनी केला आहे.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या अल्पवयीन मुला-मुलींची आपण खुलेपणाने संवाद ठेवून अशा प्रकारे त्यांच्या मनात कुठलाही ताण तणाव किंवा आकर्षण निर्माण होऊन त्यांच्यावर अपहरणाचा प्रसंग येऊ नये यासाठी आपल्या पाल्यांसोबत मित्रत्वाने मोकळेपणाने वागून संवाद ठेवावा .तसेच अल्पवयीन पाल्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या व ते वापरत असलेल्या मोबाईल ॲप वर लक्ष ठेवावे .
सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क - 8483038953वर माहिती द्यावी
( संजय आर ठेंगे )
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन राहुरी .








