महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा..

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वनमहोत्सव उत्साहात साजरा..

*राहुरी विद्यापीठ, दि. 27 जुलै, 2023*

 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती परिसरात वनमहोत्सवानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. वनमहोत्सव कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदनगर जिल्ह्याचे सामाजीक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक श्री. सचिन कंद उपस्थित होते. यावेळी कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक श्री. विजय पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, राहुरी येथील सामाजीक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. शुभांगी मिश्रा व अधिदान व लेखा अधिकारी श्री. सुर्यकांत शेजवळ उपस्थित होते. 

 यावर्षी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे, विस्तार केंद्रे, तंत्र विद्यालयांमध्ये 81500 वृक्ष लागवडीचे नियोजन केलेले आहे. आज मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर 11 हजार आंबा, जांभूळ, पेरु, सिताफळ, बांबु, मोहगणी, चिलार, सागरगोटा इ. झाडांची लागवड करण्यात येणार आहे. विद्यापीठात आजपर्यंत वनमहोत्सावात 4,67,340 वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यापैकी 83 टक्के वृक्ष आज चांगल्या अवस्थेत आहेत. याप्रसंगी सेंद्रिय शेती प्रकल्प, कास्ट-कासम प्रकल्प, आदर्श गाव योजनेतंर्गत पाणलोट क्षेत्र, गो संशोधन व विकास प्रकल्प, पदव्युत्तर महाविद्यालय प्रक्षेत्र, उद्यानविद्या रोपवाटीका, मधुमक्षीका उद्यान या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली. वनमहोत्सव कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करुन झाली. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत संचालक, विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांनी केले, कार्यक्रमाची रुपरेषा डॉ. गोकुळ वामन यांनी विषद केली व मान्यवरांचे आभार डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. आनंद सोळंके, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. उल्हास सुर्वे यांनी त्यांच्या प्रक्षेत्रावरील वृक्षरोपनाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे नियोजनात जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन, डॉ. बाबासाहेब भिंगारदे, श्री. संजय पाटोळे, श्री. सुनिल धीवर यांनी परिश्रम घेतले. आज झालेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.