आधी खाकी मग बाकी, उपअधिक्षक संतोष खाडेंमुळे अवैध धंदे करणारे सुतासारखे सरळ

आधी खाकी मग बाकी, उपअधिक्षक संतोष खाडेंमुळे अवैध धंदे करणारे सुतासारखे सरळ

माझ्या गरजा कमी आहेत, म्हणूनच माझी विवेकबुद्धी मजबूत आहे' -

उपाधिक्षक - संतोष खाडे .

अवैद्ध धंदे करणारे झाले सुतासारखे सरळ! वर्दीची शान वाढली.

           माझ्या बालपणापासून तर आतापर्यंत वयाच्या गेल्या पंचविस वर्षांपर्यंत मी पहातो तसे माझ्या आई - वडीलांनी ऊसाच्या फडात कोयता अन् ऊसाची मोळी उचलण्याचे अपार कष्ट केलेले आहेत हे काम करत असतांना आमच्या कुटूंबियांची दिवाळी सणही नेहमीच ऊसाच्या फडात साजरा झालेला आहे आपण आई - वडीलांनी केलेल्या कष्टाचे चिज करुन मी पोलीस उपाधिक्षक या पदापर्यंत पोहचलेलो आहे सततच्या गरीबीमुळे आमच्या कुटूंबिंयाच्या गरजा नेहमीप्रमाणे आतापर्यंत कमीच रहात आलेल्या आहेत आणि उद्याही कमीच राहणार असल्यामुळे माझ्या पगारात माझा आणि आई - वडीलांचा खर्च मोठ्या आनंदात भागत असून आता मी पोलीस उपाधिक्षक पदावर नेवासा पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून रुजू झाल्यामुळे आता मला माझ्या कुवती प्रमाणे समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींचा बिमोड करण्यासाठी आणि खाकीवर्दीची शान आणि मान वाढविण्याचाच माझा सततच प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे "मेरी जरूरतें कम हैं,इसलिए मेरे जमीर में दम है" असे रोखठोक वक्तव्य नेवासा पोलीस ठाण्याचे परिविक्षाधिन प्रभारी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी पञकारांशी वार्तालाप करतांना केले.

          यावेळी नेवासा पोलीस ठाण्यात पञकारांशी बोलतांना त्यांनी त्यांच्या आई - वडीलांनी घेतलेल्या कष्टांपासून तर थेट नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस उपाधिक्षक पदापर्यंत मारलेली मजल याचा संक्षिप्तपणे लेखाजोखा पञकारांसमोर मांडत "पहीली खाकी,मग बाकी" हे धोरण स्विकारत तत्वाशी तडजोड न करता अवैद्ध धंद्यांवर आपण कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्टपणे सांगून समाजात गुंडांकडून सज्जनांना ञास होवू न देता,गुंडाची गुंडगिरी बंद करण्यासाठी आपला कारवाईचा असाच धडाका कायम सुरु ठेवणार असल्याचा इशारा यावेळी बोलतांना पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी दिला.

           यावेळी त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईचा थेट लेखाजोखाच पञकारांसमोर स्पष्टपणे मांडत आपण अवैद्ध धंदे करणारांची दादागिरी मोडीत काढून अवैद्ध धंदे करणाऱ्यांचा रुबाब पोलीसांवर न रहता पोलीसांचा दबाव या अवैद्ध धंदे करणाऱ्यांवर ठेवून आपण खाकीची शान आणि मान वाढविणार असल्याचे त्यांनी यावेळी पञकारांशी बोलतांना स्पष्टपणे सांगितले खाकीच्या रुबाबाची शिस्त लावून गुंडांचा बिमोड करत सज्जनांना भयमुक्त वातावरण करुन या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नेवासा नगरीची धार्मिकदृष्ट्या असलेली ओळख सातासमुद्रापार घेवून जाण्यासाठी खाकीवर्दी या पुण्यभूमित चांगले काम करणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त करत आपली रोखठोक भूमिका पञकारांसमोर दिलखुलास पणे विशद करत मनमोकळा संवाद साधला .

       नेवासा पोलीस ठाण्यात सध्या नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी एकदिलाने चांगल्या कामगिरीसाठी आपणाला नेहमी साथ देत असून पोलीस अधिकारीही यामध्ये सहभागी होत असल्याचा सार्थ अभिमान आपणाला असल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी पञकारांशी बोलतांना काढले .

        अवैद्ध धंदे करणाऱ्यांवर पोलीस मोठी खमकी भुमिका घेत असल्यामुळे काही अवैद्ध धंदे करणारी मंडळी आता सोंगाडबाज्याची भुमिका उठवत "उलटा चोर कोतवॉंल को डॉंटे'चा प्रताप करत असल्यामुळे आपणही त्यांना हा चंद्र आणि हा सुर्य दाखविण्याची तयारी ठेवून असून पोलीसांशी घेतलेल्या पंग्याला आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नसल्याची भूमिकाही यावेळी पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी बोलतांना स्पष्ट करत आपली स्पष्टोक्ती भूमिकाही यावेळी मांडून गुन्हेगारांची पळतीभुई थोडी करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.