.
चांदा येथे कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या बावीस गोवंशीय जनावरांची सोनई पोलिसांकडून सुटका.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श माणिक चौधरी यांना गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चांदा, तालुका नेवासा गावामध्ये कत्तलीसाठी गोवंश जातीची लहान मोठे जनावरे आणलेले आहेत. सदर बातमीची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन, व पोलीस स्टेशनच्या स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई केली. सदर कारवाई मध्ये गोवंश जातीची लहान-मोठे एकूण 22 जनावरे किंमत अंदाजे 03 लाख 62 हजार रुपये प्रमाणे मिळून आल्याने सदरची जनावरे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षेसाठी नंदनवन गोशाळा पाथर्डी येथे पाठवण्यात आली आहेत. सदर कारवाई मध्ये एकूण तीन आरोपी मिळून आले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1) बाबू दाऊद शेख वय 35 वर्ष
2.) जावेद युसुफ शेख वय 44 वर्ष
3) शब्बीर पठाण वय 22 वर्ष सर्व राहणार चांदा तालुका नेवासा
याप्रमाणे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गावडे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली,
स पो नि.माणिक चौधरी, पो उप नि राजु थोरात, पो हे काँ. राजेंद्र औटी,पो हे काँ. प्रवीण आव्हाड,पो हे काँ. दत्तात्रय गावडे, पो. ना. सोमनाथ झांबरे, पो काँ. वैभव शित्रे,पोकाँ.निखिल तमनर ,पो काँ. मृत्युंजय मोरे,पो काँ. सचिन ठोंबरे,पो