शासनाच्या मान्यता प्राप्त शाळांनी कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रक्कम आकारू नये
शासनाच्या मान्यता प्राप्त शाळांनी तसेच म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथील शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून कुठल्याही प्रकारची ( फी ) रक्कम आकारु नये यासाठी पत्र व्यवहार केले आहे.
विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारली जाते यामुळे ता. राहुरी जि. अहमदनगर येथील पालकां मध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे तरी ज्या शासकीय मान्यता प्राप्त शाळा आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे विद्यार्थी / पालकवर्ग यांचेकडून रक्कम आरकारली जाऊनये यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटणे चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री कृष्णा गायकवाड १ )जिल्हा उपाध्यक्ष २ ) श्री सचिन पवार ३ ) जिल्हा प्रवक्ता श्री आर आर जाधव ४ ) संभाजी शिन्दे ५ ) यशवंत पाटेकर ६ ) सुहास पारखे ७ ) मनोज गायकवाड ८ ) किरण पवार ९ ) योगेश पवार आदी उपस्थीत होते
तसेच शाळेला शासकिय फंड देखभाल दुरुस्ती साठी येतो त्याचे काय ?
शाळांमध्ये विद्यार्थांसाठी जो विद्यार्थी कल्याण निधी येतो तो त्याचेपर्यंत पोहोचत नाही अशा अनेक समस्या शाळांमध्ये आहेत त्याची वेळेतच शासनाने दखल घेणे गरजेचे आहे विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडला पाहीजे यामध्ये शिक्षकांचे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .