पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व खंडणीची मागणी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण व खंडणीची मागणी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश.

प्रतिनिधी संभाजी शिंदे, खेडले परमानंद

दिनांक 27 /4 /2022 रोजी भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे (वय 48)राहणार मुसळेवस्ती लोणी यांचे किरण दुशिंग व इतर अज्ञात तीन व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे हात उपरन्याने बांधून पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून, त्यांच्या खिशातील 11500, विवो कंपनीचा मोबाइल व त्यांच्याकडील पल्सर मोटर सायकल असा 48500 किमतीचा त्यांच्या जवळील रोख रक्कम व मुद्देमाल काढून घेतला.

        भाऊसाहेब धोंडीराम देव्हारे यांना मारहाण करून साडे तीन लाखाची खंडणी स्वरूपात रक्कम मागितली. सदर आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये फिर्यादी धोंडीराम देव्हारे यांना घेऊन जात असताना फिर्यादी यांनी लोहारे गावातील लोकांची गर्दी पाहून.

          जीव वाचवण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडत आरडाओरडा केला. लोकांनी तत्काळ गाडी अडवताच आरोपी धास्तावले व त्यांनी गाडी सोडून रस्ता सापडेल तिकडे पळ काढला.

         जमलेल्या लोकांनी फिर्यादी भाऊसाहेब देव्हारे यांची सुटका केली.

             या घटनेबाबत ची फिर्यादी भाऊसाहेब देव्हारे यांनी संगमनेर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 165/2022 भादवि कलम 364(अ), 397, 384,34 आर्म एक्ट3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

             सदर घटनेची समांतर चौकशी करून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अनिल कटके यांना गुन्ह्याचा तपास करण्याबाबतचे आदेश दिले.

          पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये सदर पुण्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी अनील कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून तपास करण्याबाबतचे आदेश दिले. 

      या गुन्ह्याबाबत तपास यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर पोलिसांना गुप्त यंत्रणेकडून खात्रीशीर माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी किरण दुशिंग हा राहुरी बस स्थानकाजवळ येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेशांतर करून बस स्थानक परिसरात सापळा रचला.

         काही वेळानंतर आरोपी पांढर्‍या कारमधून किरण दुशिंग उर्फ दत्तात्रय नानासाहेब दुशिंग वय 27राहणार उंबरे तालुका राहुरी उतरताना दिसला. मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला वेढा घातला व संबंधित गुन्ह्याबाबत त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. 

      परंतु त्याला विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याने त्याचे नाव

1) दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग राहणार उंबरे 

व त्याचे साथीदार

2)सुधीर मोकळ राहणार पारेगाव तालुका कोपरगाव.

3) संदीप कोरडे राहणार घोगरगाव तालुका श्रीगोंदा

      या तिघांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

       आरोपी किरण दुशिंग यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुधीर मोकळ हा गणेश नगर तालुका संगमनेर येथे आहे अशी माहिती मिळताच संगमनेर येथे जाऊन मोठ्या शिताफीने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

          संदीप कोरडे याच्या राहत्या घरी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता तो त्या ठिकाणी सापडला. घेतले व त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता. आरोपीने त्याचे पूर्ण नाव संदीप उर्फ बंडू रंगनाथ कोरडे असल्याची कबुली दिली .

        तसेच आरोपी किरण दुशिंग याच्याकडे स्विफ्ट गाडी कोणाची आहे याबाबत चौकशी केली असता, त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही गाडी मध्य प्रदेश राज्यातून चोरून आणल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या ताब्यातील दहा लाख रुपये किंमतीची कार ताब्यात घेतली.

        व तीनही आरोपी मुद्देमालासह संगमनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात खून, अपहरण करून खून, जबरी चोरी, घरफोड्या असे अकरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

              सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक भिमराज खरसे,

शंकर चौधरी, रवी सोनटक्के पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव व चालक हेडकॉन्स्टेबल बबन बेरड या सर्वांनी मिळून सदरची कारवाई केलेली आहे.

         यामध्ये पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर सौरभ कुमार अग्रवाल, विभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग राहुल मदने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी या गुन्ह्यासंबंधी ची कार्यवाही केली. व आरोपींना जेरबंद केले.