जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे शासनातर्फे देण्यात आलेल्या शालेय गणवेश व शालेय पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण.

खेडले परमानंद ///वार्ताहर///
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेले शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके त्याचप्रमाणे शालेय गणवेशाचे वितरण खेडले परमानंद ग्रामपंचायतीचे उपसरपंच जावेद इनामदार,तंटामुक्ती अध्यक्ष दगू बाबा हवालदार,विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सूर्यकांत तुवर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी यावेळी इयत्ता पहिलित दाखल विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करन्यात आला ,यावेळी शाळेचे शिक्षक संतोष निमसे सर यांनी वर्षभरात राबवनारे शेक्षणिक उपक्रमाविषयीचा आराखडा सांगितला व शाळेच्या अडिअडचनी विषयी माहिती दिली ,कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता आव्हाड मॅडम,सहशिक्षक संतोष निमसे सर,शिक्षिका सविता दरंदले त्याचप्रमाणे पत्रकार संभाजी शिंदे उपस्थित होते,
यावेळी शाळेच्या विविध प्रश्नांसंदर्भात सविस्तर आढावा घेऊन लवकरच प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व शाळेच्या दृष्टीने आवश्यक असलेले कामे करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रयत्न करण्यात येतील असे मान्यवरांच्या वतीने सांगण्यात आले.