सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न,विद्यालयाचे नावलौकिक वाढवण्यास विद्यार्थी,पालक व शिक्षकांचा मोठा सहभाग - कुलगुरू डॉ . पी.जी. पाटील
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न करण्यात आला .स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून तालुक्यातील पहिली गणित प्रयोगशाळा या विद्यालयात सुरू करण्यात आली .या प्रयोगशाळेचे उद्घाटन यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली .
माध्यमिक विद्यालयाचे एनसीसी अध्यापक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम पथ संचालन करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली .
यावेळी डॉक्टर पी जी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे इतर कृषी विद्यापीठांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे सांगितले आहे .विद्यापीठाप्रमाणेच विद्यापीठातील विद्यालयानेही विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यामध्ये चांगले नाव उंचावल्याने विद्यार्थी पालक व शिक्षक यांचे कौतुक कुलगुरूंनी केले आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी केलेतर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी केले आहे .
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे,उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा,प्राथमिकचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री,इंग्लिश मेडीयमच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे विद्यालयाचे खजिनदार महेश घाडगे तसेच विद्यापीठातील पदाधिकारी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .