देडगाव येथील देवीवस्ती वरील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सव सोहळ्याला सुरुवात.
नेवासा :- प्रतिनिधी युनूस पठाण
*बालाजी देडगाव येथे रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाची धार्मिक उपक्रमाने सुरुवात.*
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवी वस्ती परिसरातील जागृत श्री रेणुका मातेचे मंदिर आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव निमित्त विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 21 रोजी मोहटा देवी या ठिकाणाहून ज्योत आणून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण देडगाव ,तेलकुडगाव परिसर यांनी दि.22 रोजी सामुदायिक देवी जवळ घटस्थापना केली.

तर दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत ह भ प रामायणाचार्य बबन महाराज पाटेकर गेवराई यांच्या देवी कथेला सुरुवात करण्यात आली आहे. पहाटे चार ते सहा काकडा भजनाचे ही आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महिला मंडळींच्या वतीने हरिपाठ याचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दिवाबत्ती व पुष्प माळ घातली जाते. दररोज महाआरतीचे दररोज आयोजन करण्यात येत असते . नंतर आलेल्या भाविकांना सकाळ व सायंकाळ फराळाच्या अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशा अनेक धार्मिक उपक्रमांनी हा सोहळा भाविकांच्या उपस्थितीत गजबजुन गेला आहे. हजारो भाविकांची मांदियाळी या रेणुका मातेच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत आहे. या ठिकाणी जगन्नाथ शेटे पुजारी म्हणून सेवा करत आहे.

हे मंदिर अतिशय प्राचीन ऐतिहासिक असून शके साल 1541 कालीन याची नोंद आहे. तर जागृत देवस्थान म्हणून परिसरामध्ये प्रख्यात आहे भव्य अशी रेणुका मातेची तेजस्विनी मूर्ती असून नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या परिधान करत असते. तर या नवरात्र उत्सवात भाविकांची मनोकामना पूर्ण होत असते.
या नवरात्र सोहळ्यासाठी जय भवानी युवा ग्रुप देवी वस्ती हे अनमोल सहकार्य करत आहेत.

त्यानिमित्ताने आज गुरुवार 25 रोजी ह भ प बाल कीर्तनकार पवन महाराज नजन यांची कीर्तन रुपी सेवा सायंकाळी 8 ते 10 वेळेत पार पडणार आहे . तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका माता मंदिर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.








