श्री क्षेत्र सराला बेट येथील सदगुरू गंगागिरी महाराज पालखीचे श्रीरामपूरात जल्लोषात स्वागत
किशोर भगत
श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र सराला बेट येथील सदगुरू गंगागिरी महाराज यांची पालखी मंगळवार दि १३ जुन रोजी मार्गस्थ होऊन उंदिरगाव येथे पहिला मुक्काम करून बुधवारी सायंकाळी श्रीरामपूर येथे पोहोचली . संपूर्ण पालखी मार्गावर जल्लोषात पालखीचे स्वागत झाले . शहरात ठिकठिकाणी पालखीची मोठया भक्तीभावाने पूजा करण्यात आली . या वेळी मठाधिपती सदगुरू रामगिरी महाराज व इतर संत जण पालखी बरोबर पाई चालत होते .
संध्याकाळी ५ वा थत्ते मैदानावर पालखीचे पहिले गोल रिंगण मोठया उत्साहात टाळमृदंगाच्या गजरात पार पडले . या वेळी पालखीच्या आश्ववांनी रिंगणात धावत सदगुरूंना मानवंदना दिली . या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती . सर्वत्र भगव्या पताका , टाळांच्या गाजरा ने वातावरण भक्तीमय झाले होते . यावेळी पालखीवर जेसीबीतुन पुष्पवृष्टी करण्यात आली . या दिव्य सोहळयानंतर उत्सव मंगल कार्यालय या ठिकाणी महंत रामगिरी यांचे प्रवचन होऊन पालखी विसावली .