राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी म.फु.कृ. विद्यापीठ आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा.कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील...

राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी म.फु.कृ. विद्यापीठ आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा.कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील...

विद्यापीठ प्रकल्पग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी साठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने कृषि विद्यापीठ आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यास मदत होईल. सर्व शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा. कृषि विद्यापीठ विकसित आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतात राबून उत्पादनात भरघोस वाढ करावी असे आवाहन आमदार श्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी केले. 

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून कृषि विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि भारतीय हवामान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण कृषि मोसम सेवा अंतर्गत हवामान बदल व त्या आधारित शेती व्यवस्थापन व शेतकरी जागरूकता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आणि आ. श्री प्राजक्तदादा तनपुरे, प्रमुख पाहुणे म्हणून कृषिभूषण श्री संजीव माने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ सुनिल गोरंटीवार कृषिविद्या विभाग प्रमुख. डॉ. आनंद सोळंके, आंतरविद्या शाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, ग्रामीण कृषि मोसम सेवाचे समन्वयक डॉ. रवी आंधळे, कृषिभूषण श्री सुरसिंग पवार उपस्थित होते.  

प्रमुख मार्गदर्शन करताना श्री संजीव माने म्हणाले खोडवा उसाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर पाचट पेटू नका, त्याची कुट्टी करू नका, पाचट सरी आड करा, बुडखे जमिनीलगत छाटा, ऊसाच्या वाढीच्या काळात त्याच्या शेंडेला इजा पोह्चू देऊ नका, खोडवा उसाच्या मुळांचा जारवा तोडू नका, मुख्य व दुय्यम अन्नद्रव्य पहारीच्या सह्याने द्या, सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड स्वरुपात द्या, या सूत्रांचा वापर केल्यास खोडव्याचे उत्पादन एकरी 10 ते 15 टनाने निश्चित वाढते. मला हे ज्ञान कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्या संपर्कात आल्यानंतर मिळाले.कृषि विद्यापीठ हे तुमच्या हाकेच्या अंतरावर असल्याने तुम्ही फार नशीबवान आहात. तुम्ही नेहमी शास्त्रज्ञांच्या संपर्क असणे गरजेचे आहे.मी माझे ऊसाचे उत्पादन एकरी २२ टना पासून ते आज 150 टनापर्यंत नेले आहे. हे सर्व कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात आल्यामुळे शक्य झाले आहे.   

यावेळी संचालक संशोधन डॉ. सुनील गोरंटीवार मार्गदर्शन करताना म्हणाले कृषि विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमाचा प्रकल्पग्रस्त गावांनी जास्तीत-जास्त फायदा घ्यावा. कृषि विद्यापीठ प्रकल्पग्रस्त गावांमध्ये ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी कशी करायची यासंदर्भात प्रात्यक्षिके घेण्यात येतील.याप्रसंगी डॉ. अनिल दुरगुडे यांनी जमिनीची सुपिकता यावर तर इफकोचे क्षेत्र प्रतिनिधी श्री. वैभव ढेपे यांनी नॅनो यूरिया यावर शेतकऱ्याना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. आनंद सोळंके यांनी केले तर स्वागत व आभार डॉ. महानंद माने यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकर्यांना कृषिदर्शनी-२०२४ आणि मफुकृवि कॅलेंडरचे वाटप करण्यात आले. या परिसंवादामध्ये श्री सचिन भिंगारदे. श्री प्रकाश भोंडे, श्री सचिन शेटे, श्री नवनाथ ढगे उपस्थित होते. याप्रसंगी. खडांबे, सडे, राहुरी खुर्द, गोटुंबे आखाडा, वरवंडी या कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.