छंद बनला आनंदाचा ठेवा ग्रामीण भागातील शिक्षकाचे सांगीतिक योगदान.

छंद बनला आनंदाचा ठेवा ग्रामीण भागातील शिक्षकाचे सांगीतिक योगदान.

छंद बनला आनंदाचा ठेवा 

श्री. संदीप नांगरे सर यांच्या मार्गदर्शनात पाच विद्यार्थी या वर्षी तबला परीक्षेसाठी प्रविष्ठ 

  देडगावचे भूमिपुत्र श्री. संदीप नांगरे सर यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय गांधर्व विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या तबला या विषयाच्या परीक्षेसाठी यावर्षी पाच विद्यार्थी प्रविस्ट झाले.

   श्री. संदीप नांगरे सर हे देडगाव केंद्रात जि. प. प्रा. शाळा, तांबे वस्ती येथे कार्यरत असून त्यांनी तबला या विषयात विशारद हि पदवी मिळवली आहे. ज्याचा उपयोग ते शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रार्थना, देशभक्तीपर गीते यांच्यासाठी करत असतात.

   याशिवाय आपल्याकडे तबला या विषयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी शास्त्रीय पद्धतीने तबला विषयाचे दर्शन घडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

  अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये श्री. नांगरे सर यांनी त्यांचा तबला विषयाचा अभ्यास सुरु ठेवला आहे.

   विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविणारे देडगाव मधील ज्येष्ठ प्राथमिक शिक्षक श्री. गोरक्षनाथ गंगाधर नांगरे गुरुजी यांचे श्री. संदीप नांगरे सर हे द्वितीय चिरंजीव असून देडगावमधील या नांगरे घराण्याला शिक्षणाचा सुमारे चार पिढ्याचा वारसा आहे.

   श्री. संदीप नांगरे सर यांचा मराठी साहित्याचाही उत्तम अभ्यास असून हि सर्व वडील श्री. गो. गं. नांगरे गुरुजी यांची पुण्याई असल्याची भावना श्री. संदीप नांगरे सर व्यक्त करत असतात.

  आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ख्यातनाम तबलावादक श्री. यशवंत वैष्णव यांच्या कार्यशाळांना श्री. संदीप नांगरे सर यांनी उपस्थिती लावली असून तबल्या संबंधी काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत.

  श्री. संदीप नांगरे सर यांच्या मार्गदर्शनात यावर्षी त्यांच्याच ज्येष्ठ कन्या कु. भक्ती संदीप नांगरे, श्री. सतीश कासार, चि.सोजस शिंदे,चि. संविधान काळे व चि. बाबासाहेब देवदान दळवी यांनी प्रारंभिक ते मध्यमा पूर्ण या विविध परीक्षा दिल्या.

चि. बाबासाहेब दळवी व सोजस शिंदे हे विद्यार्थी आपापल्या परिसरात आपल्या तबलावादनाने श्रोत्यांची मने जिंकत

आहेत.