विद्यार्थ्यांनी त्यांची पदवी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे कुलगुरूंनी केले आवाहन .
*विद्यार्थ्यांनी त्यांची पदवी प्रमाणपत्रे घेवून जाण्याचे कुलगुरुंनी केले आवाहन*
*राहुरी विद्यापीठ, दि. 29 जून, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बर्याचशा विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत उत्तीर्ण प्रमाणपत्रे प्राप्त केली नसल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर प्रलंबित असलेली पदवीप्रमाणपत्रे विहीत करण्यात आलेले शुल्क भरून ताब्यात घ्यावीत. पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाच्या www.mpkv.ac.in <http://www.mpkv.ac.in> या संकेतस्थळावर तसेच उपकुलसचिव (विद्या) या कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. {वद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे असलेले स्वत:चे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर घेवून जाण्याचे आवाहन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. पी.जी. पाटील यांनी केले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये पदवी प्रमाणपत्रे बहाल करण्यात येतात. तथापी विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे पदवीप्रदान समारंभ पार पडल्यानंतर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ताब्यात घेणे अपेक्षित आहे.