शेवगाव पाथर्डीच्या आमदार यांचा तहसील प्रशासनावर दबाव. शेतकऱ्यांना करावे लागले दोन दिवस आंदोलन.मागे हटले नाही शेतकरी .आणि वंचित बहुजन आघाडी.... अखेर तहसील प्रशासन नमले .

शेवगाव पाथर्डीच्या आमदार यांचा तहसील प्रशासनावर दबाव. शेतकऱ्यांना करावे लागले दोन दिवस आंदोलन.मागे हटले नाही शेतकरी .आणि वंचित बहुजन आघाडी.... अखेर तहसील प्रशासन नमले .

शेवगाव पाथर्डी च्या आमदार यांचा तहसील प्रशासनावर दबाव ,शेतकऱ्यांना करावे लागले दोन दिवस आंदोलन पण मागे हटले नाही शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी... अखेर तहसील प्रशासन नमले .

 

        मौजे वरूर येथील गट नंबर ९१७ व इतर गटामधील शेता मध्ये येणे जाणे करिता रस्ता खुला करावा या करिता मौजे वरुर येथील २५ शेतकरी बांधवासह वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते गुरुवार दि २१/७/२०२२पासुन सलग दोन दिवस ठिय्या आंदोलन करत होते तसे पहाता दोन दिवस आंदोलन करण्याची अवशक्ता नव्हती पंरतु शेवगांव पाथर्डी चे आमदार यांनी शासकिय आधिकार्यांवर दबाव तंत्राचा वापर केला व आंदोलन करर्त्यांना विनाकारण वेढीस धरले या कारणाने शेतकर्यांमध्ये लोकप्रतिनिधि विरोधात शेतकरी बांधवामध्ये असंतोष निर्माण झाला आहे आंदोलनकर्ते व वंचित बहूजन आघाडीने तिव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्याचे धाडसी निर्णय घेतल्याने मा तहसीलदार साहेब यांनी तत्परता दाखवली व रस्त्यापासुन वंचित असलेल्या शेतकरी बांधवाना लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनास शेवगांव पोलीस निरीक्षक मा विलास पुजारी साहेब, गोपनिय शाखाधिकारी खेडकर यांनी योग्य मार्गदर्शन, सहकार्य केले या आंदोलनास नवाज शरीफ दिलावर, अनिल मछिंद्र म्हस्के, शेख बादशाह महंमद,नजमा सुभान शेख, शेख बादशाह महंमद,छबूबाई विठ्ठल झिरपे, शहाबुद्दीन नजीर शेख, रामदास सुधाकर सोनटक्के, शेख अफसर नजीर, विशाल रामदास सोनटक्के,शेख दिलावर बादशाह, शेख फरदिन सुभान, शेख दिलावर बाबूलाल सह वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई,राजूभाऊ नाईक,सागर गरूड़, शेख सलीम जिलानी,बाळू साळवे, शेख राजूभाई, सचिन महाजन, अज्जू कुरैशी,व ईतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार सांयकाळी ५/३० वाजता वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाणसर यांनी आंदोलनकर्त्याना बरोबर घेऊन मा तहसीलदार यांच्या दालनात चर्चा केलि आणी मा तहसीलदार शेवगाव यांनी लेखी पत्र दिले की मंगळवार दि २६/७/२०२२ रोजी आपण स्वत: उपस्थित राहून रस्ता खुला करणे करिता पोलीस बंदोबस्तासह उपस्थित राहील तसेच या शेतकरी बांधवांनंच्या कामात तसेच शासकिय कामात जो व्यक्ति अडथळा निर्माण करेल त्या व्यक्तिंच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० वे कलम ३५३ अन्वेय संबधीतावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे पत्र मा तहसीलदार साहेब यांनी शेवगांव पोलीस निरीक्षक यांना दिले या प्रसंगी प्रा किसन चव्हाणसर म्हणाले की सध्या पेरणी,लागवढ,मशागत व ईतर कामे शेतकरी बांधवाना करणे गरजेचे आहे त्या करिता कोणत्याही शेतकरी बांधवांनी रस्त्याबाबत अडवणूक करू नये वरुर येथील शेतकरी बांधवाना योग्य न्याय मिळेल अशी वंचित बहूजन आघाडी तर्फे मी अपेक्षा करतो लेखी पत्र दिल्याप्रमाणे न्याय मिळणार हे मात्र निश्चित आहे या करिता दोन दिवसापासून सुरू असलेले आंदोलन स्थगित केले आहे असे प्रा. किसन चव्हाणसर म्हणाले.