शिवाजी महाराजांची खास गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी अशीच आदर्श घ्यावीत
Il शिवाजी जयंती विशेष ll
नागपुर-सावनेर: भारतीय पत्रकार संघटना व बीपीएस लाइव न्यूज कडून महाराष्ट्रतील सर्व नागरिकांना आणि वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा…!
कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.सगळीकडील वातावरण भगवं झालं आहे.दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत. पाहुयात त्यांची अशीच काही खास गुणवैशिष्ट्ये जी आपल्यालाही स्वीकारता येतील.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा ‘ पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ 29 व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते, हे प्रत्येकांनी कधीही नजरेआड करून चालणार नाही.
अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे रक्षण केले.
महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना अगदी कडक शासन केले जाई. तसेच अगदी शत्रूच्या राज्यातल्या स्त्रियांना देखील आदरानं वागवावं, अशी ताकीद महाराजांनी दिली होती.
‘स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो’ अशी महाराजांची भूमिका होती.
महाराजांनी स्वराज्य स्थापण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या मात्र एकनिष्ठ असणाऱ्या शूर, त्यागी मावळ्यांची साथ घेतली. स्वराज्यातील गरिब शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कमा नये असा आदेश त्यांनी दिला. दुष्काळाच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांचा महसूलही माफ केला होता. महाराज आपल्या साथीदाराबरोबर कशी वर्तणूक करत आणि त्यांचे जे मावळे होते ते ही शिवाजी महाराजांच्या एका शब्दाखातर जीवाचं रान करून स्वराज्य रक्षणासाठी काम करत होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज असे मुखातूनही निघाले तरी जनतेच्या शरीरात रक्त संचारण्याचा वेग वाढतो, असे का होत बर तर त्या राजाने केलेले पराक्रम रयतेचा सार्वभौम विकास आणि त्याची सुखी प्रजा ठेवण्याचे तंत्र आजच्या पिढीला आचरणात आणावेसे वाटते. पण नेमकं आज घडत काय तर प्रत्येक कार्य करत असतांना जात धर्म यांची भिंत आडवी येते, पण हे असे नाही कारण जेव्हा शिवरायाचा थाट होता तेव्हा जाती धर्माचा वाद झालाच नाही, न शिकतानाही त्यांनी नीतीमूल्य अंगिकारली होती. म्हणून त्या काळातील लोकांमध्ये निधर्मिपणा होता आणि तो योग्य होता.
आजच्या जनतेला शिवाजी महाराज नक्कीच आठवतात. कारण त्यांच्या वागण्यात बोलण्यात धर्मनिरपेक्षता होती त्यांचे अष्टमंडळ असो या कार्यकारी मंडळ सर्व लोकांना त्यांनी हक्काने अधिकार प्रधान केले होते. शिवबाची नीतीमत्ता सार्वजनिक, लोकांसाठी लाभदायक होती. दारिद्र्यातून मुक्त करणार शस्त्रं ह्या शिवाजी महाराजांच्या रुपात लाभलं होत. महाराजांच्या संकल्पनेतून मावळ्यांचा आवर्जून सत्कार सन्मान करणं त्या काळच्या रयतेला अभिमानस्पद वाटायचं. आयुष्यात जाती धर्मापेक्षा सुख समृद्धीला माणुसकी महत्वाची आहे तिला वाढवली पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करतांना समाजिक दातृत्वाचे व कर्तृत्वाचे धडे मावळे शिवरायांच्या युद्ध तंत्रातून आणि त्याच्या आपतकालिन युद्ध शैली व संस्काररुपी जाती धर्मचा सन्मान त्यांनी जगाला शिकवला.