*शिधापत्रिका वापरकर्त्यांना वेळेतच माल दया- अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सोलापूर- जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या 1 लाख 13 हजार इष्टकांची मागणी करण्यात आली. सोलापूर ग्रामीण भागासाठी 49 हजार 821 आणि शहरी भागासाठी 14 हजार 521 प्रमाणे 64 हजार 342 जणांचा इष्टांक वाढवून दिला आहे.
वाढवून दिलेल्या सर्व लाभार्थ्यांना ताबडतोब माल मिळावा कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहता कामा नये प्रत्येक कुटुंबाला वेळेतच माल पुरवठा दक्षता विभागाने घेण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी दिली.
शासकीय विश्रामग्रह या सार्वजनिक पुरवठा विभागाच्या बैठकीला बोलत होते. त्यावेळी या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे उपस्थित होते.
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शिवभोजन केंद्रे जे बंद आहेत ते प्राधान्याने महिला बचत गटांना देण्यात यावे तसेच शिवभोजन केंद्र चालका धारकांची देयके तात्काळ देण्यात यावी.
तसेच सांगोल्यातील चिकनहुद येथे नवीन शासकीय गोदाम उघडण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असेही ते म्हणाले. पुणे विभागातील आयएसओ मानांकन 2015 नामांकन माहिती कुलकर्णी यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील धान्य साठवणूक गोदामाची संख्या व त्याची स्थिती तसेच रेशन कार्ड दुकानांची, संख्या कार्ड धारकांची संख्या कार्यरत व शिवभोजन केंद्र बंद असलेल्यांची संख्या याची सर्व माहिती श्रीमती लांडगे यांनी दिली.
तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांना वेळेत माल मिळेल असे भुजबळ यांनी या बैठकीत बोलताना सांगितले.