रोकडोबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने येलवाडी गावात भरविले कुस्तीचे मैदान
- प्रतिनिधी पुणे- दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही येलवाडी गावात श्री रोकडोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गावामध्ये पहिल्या दिवशी मानाच्या पालखी ची मिरवणूक काढण्यात आली व नंतर संध्याकाळी लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम संपन्न झाला.त्याच प्रमाणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भव्य कुस्त्यांची स्पर्धा भरवण्यात आली होती.या स्पर्धेत जवळपास ७० पैलवानांनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये सर्व मिळून ३५ कुस्त्या झाल्या.यामध्ये पै समाधान दगडे विरुध्द पै शंकर मोहिते ही अंतिम लढत झाली या लढती मध्ये पै शंकर मोहिते हे विजयी झाले.गावच्या वतीने विजयी पैलवानांसाठी मानाच्या गदा आणि रोख दोन लाख रुपयांपर्यंत इनाम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमात गावातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अतिशय उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजन व संयोजक मंडळी चे ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले.