नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे विद्युत महावितरण चे नूतन लाइनमन व वायरमन यांचा सन्मान.
भारतीय पत्रकार संघटन नेवासा तालुका प्रतिनिधी
युनूस पठाण
आज बालाजी देडगाव येथे विद्युत महावितरण चे नवनिर्वाचित लाईनमन आनंदा जावळे साहेब व वायरमन कृष्णा सटाले साहेब यांनी देडगाव चा नविन पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच ज्यांनी आतापर्यंत चांगले जबाबदारीने काम केले असे कर्तव्यदक्ष सहाय्यक लाईमन एस. टी. विरकर साहेब व त्यांचे सहकारी बबन तिडके यांचाही देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच यांनी गावाबद्दल माहिती देऊन कामाचं योग्य ते नियोजन करावं व गावाला लाईट ची व्यवस्थित सुविधा करावी अशा सूचना यावेळी दिल्या .यावर नूतन अधिकारीही यांनी आम्ही जबाबदारीने काम करू व कुठलाही अडथळा होणार नाही याची कायम काळजी घेऊ गावाचं हित बघू असे आश्वासन दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव बनसोडे , नारायण एडके ,व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे ,बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, अंकुुश मुंंगसे , बळूूराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे, किशोर मुंगसे , पत्रकार विष्णु मुंगसे व आदी मान्यवर उपस्थित होते.