क्रेटा कारला डस्टरने दिलेल्या हुलकावणीत घडला भीषण अपघात. अपघातात दोन ठार तर एक जखमी.

क्रेटा कारला डस्टरने दिलेल्या हुलकावणीत घडला भीषण अपघात. अपघातात दोन ठार तर एक  जखमी.

प्रतिनिधी:- संभाजी शिंदे ,खेडले परमानंद नेवासा

दिवसौं- दिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.

अहमदनगर - औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात गुरुवारी राञी १० वाजेच्या सुमारास पुण्याहून ओरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना कांगोणी शिवारात घडली आहे मृतांमध्ये एक पुरुष आणि एक स्ञी' चा समावेश आहे तर या अपघातात शिखा मुरलीधर गडपायले (वय ३६) ही महिला गंभीर जखमी झाली असून तीच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु आहे.

  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,पुणे येथील पिंपरी सौदागर येथून आपल्या क्रेटा कार (क्रमांक एम.एच.१४ जे.एक्स ४०२४) हे वाहन औरंगाबादच्या दिशेने जात असतांना समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे कांगोणी फाटा शिवारात झालेल्या अपघातात क्रेटा कारमधील परेश मुरलीधर गडपायले (वय३२) रा.पुणे पिंपरी सौदागर,तसेच सोनिका भिमराव आवसरमोल (वय ३२) रा.औरंगाबाद हे या अपघातात जागीच ठार झाले आहे तर तिसरी महीला शिखा मुरलीधर गडपायले (वय ३६) या झालेल्या अपघातात क्रेटा कारमध्ये अडकल्या होत्या त्यांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु असल्याची माहीती मृतक सोनिकाचे बंधू डॉ.सचिन अवसरमोल यांनी दिली असून मृतकांचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात करण्याची प्रक्रिया सुरुअसल्याची माहीती वैद्यकिय सुञांनी दिली.

या भिषण अपघातातील मृतकांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी राञीची वेळ असल्याने असपास मदतीला कोणीही नव्हते जखमी व मृतकांना झटपट ग्रामिण रुग्णालयात घेवून आलो माञ जखमी मृत झालेले होते अशी माहीती रुग्णवाहिका चालक गणेश लांडे यांनी यावेळी बोलतांना दिली.

            आठवड्यातील या परिसरातील हा दुसरा अपघात आहे.