सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांचा सुळसुळाट.अवैध्य व्यवसायिकांना सुगीचे दिवस.

सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांचा सुळसुळाट.अवैध्य व्यवसायिकांना सुगीचे दिवस.

प्रतिनिधी सोनई

जिल्ह्याभरात विविध अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू आहे ,परंतु सोनई पोलीस स्टेशन हद्दीत मात्र अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.

  सोन‌ई सो‌न‌ई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू ,मटका ,जुगार, अड्डे,गौण खनिज उत्खनन चंदन चोरी गुटखा सुगंधी तंबाखू अवैध्य प्रवाशी वाहतूक हे बिनधास्तपणे चालू आहे . कोणी आक्षेप घेऊ नये व आरडा ओरड होऊ नये यासाठी मोजक्याच गुन्ह्यांची दिखाऊ कारवाई करून अनेक गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचे काम पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे .

          शेकडो गुन्ह्या मागे चार सहा गुन्ह्या संदर्भात केवळ थातूरमातूर दिखाऊ कारवाई करण्यात येते.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष असतानाचे चित्र पहावयास मिळते.

             यासंदर्भात वेळोवेळी पत्रकारांमार्फत प्रसारमाध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूनही काहीही फरक पडत नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना वेळोवेळी या संदर्भात माहिती देऊनही कुठलीही कारवाई होत नाही.

              यासंदर्भात पोलीस अधीक्षकांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भारतीय पत्रकार संघटन मार्फत पोलीस महासंचालक बी .जी . शेखर यांना या संदर्भात लवकरच पुराव्यासहित निवेदन देण्यात येणार आहे काही गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल न होता तोडपाणी करुन मिटविले जात आहेत गावठी दारुचे सोन‌ई हे माहेर घर समजले जाते चौका चौकात चहाच्या हाँटेलमध्ये खुलेआम देशी दारु विकली जात आहे मटक्याचे मोठाले बुक्की येथे असुन त्यातुन दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

नेवासा तालुक्याला गुटका.सोन‌ई मधुनच जातो सोन‌ई पोलीस कारवाई करून फक्त 46 पुडया दाखवते या माघे नेमके काय गौडबंगाल आहे

नेवासा तालुक्याला सुगंधी तंबाखू व गुटका पुरवणारर्या व्यापारर्या कडे एवढाच माल कसा या मागील गुपीत काय?

           चोरीच्या सोन्याची सराफाकडून राजरोस खरेदी कारवाईच्या नावाने शून्य.

             पोलीस बेडी घालून चोरी करण्याचा चोराचा धाडसी प्रयत्न

          आपला दोषी कर्मचारी वाचवण्यासाठी पोलिसांचा पडदा टाकण्याचा केविलवाना प्रयत्न.

चोराकडे बेडी येते कुठून असे एक ना अनेक कारणांनी सोनई पोलीस स्टेशन सध्या चर्चेत आहे.