*बार्शी शहर सुभाष नगर एरियातील वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणातील पाच घरफोड्या उघडकीस, आरोपी व मुद्देमाल हस्तगत -"बार्शी पोलिसांची" उत्कृष्ट-कौतुकास्पद कामगिरी.*
बिपिएस राष्ट्रीय न्यूज सोलापुर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बार्शी शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण सोलापूर, मागील गेल्या जवळ-जवळ एक वर्षा पासून चोरी चा धुमाकूळ बार्शी शहरांमध्ये झाला होता. बार्शी शहरात जास्त प्रमाणात चोरी चा धुमाकूळ सुभाष नगर एरिया मध्ये वाणी प्लॉट, कॅन्सर हॉस्पिटल अशा ठिकाणी झाला होता.
चोरीचे जास्त प्रमाण वाढले होते, चोरांनी लोकांचे घरे फोडून, दरवाजेच्या कडी-कोंड्या उचकवटून, तोडून घरात घुसून चोऱ्या केल्या. एवढेच नाही तर घरात घुसून चाकूचा धाक दाखवून मारहाण करून घरातील सोन्याचा ऐवज पैसे लुटून अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले होते.अशाप्रकारे पाच मोठे गुन्हे घडले होते अशा संदर्भात मोठे गुन्हे बार्शी पोलीस स्टेशन मध्ये नोंदवले असता बार्शी पोलिसांनी रात्री कडोकट बंदोबस्तात पेट्रोलिंग केली.
तसेच ग्रामीण सुरक्षा यंत्रणेशी संवाद साधून व तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी शहर व तालुक्याच्या पदाधिकारी यांना बोलवुन व इतर प्रतिष्ठित नागरिकांना बोलून तात्काळ मीटिंग घेण्यात आली. तेव्हा ग्राम सुरक्षा यंत्रणेची उभारणी केली व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी शहर व तालुका पदाधिकारी यांनी जवळ-जवळ दोन महिने रात्री 1 ते सकाळी 5 वाजेपर्यंत गस्त घालत पेट्रोलिंग केली. जेणे करून पोलीस बांधवांना पण मदत व्हावी या उद्देशाने चोरीला आळा बसेल अशा प्रकारचे उत्कृष्ट काम ह्या चोरीच्या एरियामध्ये करण्यात आले.
या गुन्ह्याला उघडकीस आणण्यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या एस. पी. साहेबा मा. तेजस्विनी सातपुते यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखा बार्शी पोलीस निरीक्षक- श्री रामदास शेळके साहेब, उपनिरीक्षक- श्री उदार साहेब, उपनिरीक्षक श्री प्रवीण सीरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली व त्यांना आरोपी पकडण्यास यश मिळाले.