राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.सुनिल फुलसवंगे यांनी १५०० किलोमिटर सायकल प्रवास केला १० दिवसात पूर्ण.

राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ.सुनिल फुलसवंगे यांनी १५०० किलोमिटर सायकल प्रवास केला १० दिवसात पूर्ण.

राहुरी कृषी विद्यापीठातील प्राध्यापक आणि एनसीसी अधिकारी डॉ सुनील फुलसावंगे यांनी अहमदनगर ते कन्याकुमारी असा 1500 किलोमीटरचा सायकल प्रवास केला दहा दिवसात पूर्ण

15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी एक वाजता अहमदनगर वरून सुनील यांनी आपल्या सायकल प्रवासाला सुरुवात केली आणि सलग दहा दिवस सायकल चालवून ते भारताच्या दक्षिनेच्य शेवटच्या टोकाला कन्याकुमारीला पोहोचले.

सध्या पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरण पूरक जीवनशैली अवलंबण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने डॉ. सुनील यांनी आरोग्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी हा सायकल 1500 प्रवास केलेला आहे.

मागील पाच वर्षापासून सायकलवर विविध ठिकाणी प्रवास करणारे डॉ सुनील फुलसावंगे हे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्ापक आणि राष्ट्रीय क्षेत्र सेना अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी त्यांनी एका दिवसामध्ये अहमदनगर ते शेगाव ३४० किलोमीटर पूर्ण केले होते. तसेच पंढरपूरचे सुद्धा 220 किलोमीटर त्यांनी एका दिवसात सायकलवर पूर्ण केली होती आणि तीन दिवसांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मध्ये त्यांनी सायकलवर स्वारी केलेली आहे.

अशा प्रकारच्या राईड केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला आणि अहमदनगर ते कन्याकुमारी हे पंधराशे पस्तीस किलोमीटर अंतर त्यांनी सतत साडेनऊ दिवस दिवसात सायकलवर पूर्ण केले.

विशेष बाब म्हणजे यामध्ये त्यांनी कोणाचेही बॅकअप घेतलेले नाव्हते तसेच 16 किलो ची सायकल, सात किलो ची बॅग आणि सायकल ला हवा मारण्याचा पंप हे साहित्य जवळपास 22 किलो वजन घेऊन त्यांनी ही रायड पूर्ण केलेली आहे.

15 ऑगस्ट ला मानवंदन करून डॉ. सुनील दुपारी एक वाजता अहमदनगर वरून कन्याकुमारी ला जाण्यासाठी सायकलवर निघाले. जवळपास आठ दिवस प्लॅनिंग सुरू होतं आठ दिवसानंतर हे ठरवले गेले की आता ही राईट करायची आहे करायला किती दिवस लागतील किती सुट्ट्या टाकावे लागतील सगळे गोष्टीचे नियोजन करण्यात आल्या सोबत काय काय साहित्य घेणार आहे त्याची लिस्ट तयार करण्यात आले.

पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे पाऊस कधी पण पडू शकतो याची श्वास होती देता येत नव्हती त्यामुळे ते स्थिती येईल अशाच प्रकारचे नियोजन केले होते सुरुवातीला वेदर रिपोर्ट सुद्धा आम्ही चेक केले होते आणि कमीत कमी दहा दिवस तरी पाऊस पडणार नाही याची खात्री करून घेतली.

या या प्रवासादरम्यान करमाळा विजापूर इलकल कुडलिंगी शिरा करूर बेंगलोर चतुर चतुर सत्तुर आणि कन्याकुमारी या ठिकाणी मुक्काम केलेला होता.

या प्रवासादरम्यान तेथील निवासी लोकांसोबत भेटी घेण्यात आल्या.त्यांची संस्कृती त्यांची सायकल विषयी जागृती यांची माहिती घेण्यात आली.

या प्रवासादरम्यान अशी बरीच माणसे भेटली ज्यांनी आमच्याविषयी चौकशी केली आणि कौतुक केली. काही लोकांना आम्हाला राहण्यासाठी जागा दिल्या, काही जणांनी पाण्याच्या बॉटल्स आणि रिफ्रेशमेंट साठी लागणाऱ्या वस्तू दिल्या आणि तुमचा प्रवास सुखकर होवो यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या अशा गोष्टीमुळे माझा विश्वास आणखीनच वाढत गेला.

खरे सांगायचं झालं तर सायकलचा प्रवास हा तर हा प्रवास नसतो तर तो एक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी प्रवणी असतो आणि खरा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर कार मध्ये बसून किंवा बस मध्ये बसून तो तुम्हाला घेता येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही सायकलवरून प्रवास करतात त्यावेळेस रस्त्यातला लावलेला छोटासा दगड किलोमीटरचा हे सुद्धा तुमच्या लक्षात येतो आणि लक्षात राहतो. निसर्ग एवढा अफाट आहे तुम्ही जेवढे त्याचे निरीक्षण करत जा तेवढे ते निरीक्षण कमी पडते तर या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की कर्नाटक आणि तमिळनाडू की जी राज्य आहेत ही निसर्गाने भरपूर उधळण या ठिकाणी केलेली आहे. याची जाणीव आम्हाला क्षणोक्षणी होत होती. मोठमोठी डोंगर, नारळाची झाडे, ढगाची छटा, पक्ष्यांचे आवाज, डोंगर, दर्या, पाणी, हवा या प्रवासामध्ये डोळेभरून बघितल्या.

खरंतर हा प्रवास यशस्वी होण्यासाठी बऱ्याच लोकांचा हातभार लागलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचे आमचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी. डी. पवार आणि माझे विभाग प्रमुख डॉ. बाराई सर यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन लाभलेले आहेत.

वेळोवेळी प्रवासादरम्यान माझी विचारपूस करणारे माझी काळजी घेणारे राहुरी सायकल ग्रुपचे मेंबर्स अध्यक्ष श्री अरुण टाकते, गोरख मैहत्रे ,श्री पोपळघट माऊली, श्री नालकर साहेब, श्री सुनील शिंदे, राऊत साहेब, श्री कडुबा इंगळे, श्री नितीन शहाणे श्री बाच्कर साहेब , श्री विलास तरवडे, आणि इतर सर्व मेंबर यांनी मला प्रवासादरम्यान भरपूर मदत केलेली आहे.

तसेच माझे मित्र व NCC अधिकारी डॉ. अंकुश आवारे सर हे सुद्धा माझ्यासोबत सायकल वर बेंगलोर पर्यंत साथ दिली आणि मला मदत केली

ज्यांच्या मदतीशिवाय मी राईट पूर्ण करू शकत नाही अशी माझी पत्नी जयश्री आणि माझ्या कन्या गौरी आणि स्वरा यांचे सुद्धा मदत झालेली आहे.