संकष्ट चतुर्थी निमित्ताने महा पावन गणपती देवस्थान येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन. हजारो भाविकांनी घेतले दर्शन.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव , माका, पाचुंदा म. ल. हिवरा परिसरातील महा पावन गणपती मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चतुर्थीला नेवासा तालुक्यातील भविक मोठ्या संख्येने दर्शनास आले होते. या ठिकाणी विघ्नहर्ता ,गणराया ची भव्य दिव्य मुर्ती आहे. आणि या देवतेची मनोभावे पूजा केल्याने नवसाला पावते अशी आख्याईका आहे. म्हणुन भाविक भक्ती भावाने दर्शन घेण्यासाठी येत असतात. या निमित्ताने ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व बालाजी जय हरी भजनी मंडळाने भजनाचे ही आयोजन केले होते. तर अभिषेक व गणपती देवतेची आरती करुन महाप्रसादाचा भाविकानी लाभ घेतला. या महाप्रसादाचे प्रसिद्ध एडवोकेट गोकुळ भताने माका व संभाजीराव भागचंद मुंगसे देडगाव मानकरी ठरले.
या परिसरामध्ये १११ वडाची झाडं असुन तरुण युवक वेगवेगळी झाडे लावून आपला वाढ दिवस साजरा करतात. तो परीसर आता अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येत आहे.
या सर्व चतुर्थी सोहळा पार पाडण्यासाठी देवस्थानंचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त यांनी मोलाचे कष्ट घेतले .तर या सोहळ्यासाठी देडगाव पाचुंदा, माका, म. ल. हिवरा या गावातील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.