काटोल तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्र कचारीसांवगा येथे सीकलसेल सप्ताह..!!

काटोल तालुक्यातील प्राथमीक आरोग्य केंद्र कचारीसांवगा येथे सीकलसेल सप्ताह..!!

           तालुका प्रतिनिधी :- मयुर बी. कुमरे

       BPS Live News Network, Delhi

     काटोल तालुक्यातील प्रा.आ.केद्र कचारीसांवगा  येथे दि.११/१२/२२ ते १७/१२/२२  सिकलसेल सप्ताह   डॉ.दिनेश डवरे वैद्यकीय अधिक्षक ग्रा.रू.काटोल , डॉ.शंशाक व्यवहारे तालुका आरोग्य अधिकारी काटोल डॉ.मडावी वै.अ., डॉ.मयुरी सावते वैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत घेन्यात आला .

   

          या वेळी सर्व गरोदर माता यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली ,त्याचबरोबर सर्व ऊपकेद्र अंतर्गत गावातील सर्व शाळेतील मुले ,माता यांची तपासणी स्थानीक आरोग्य सेवीका , आरोग्य सेवक व आशा मार्फत करण्यात येऊन त्यांना या आजाराविषयी माहिती व जनजागृती करन्यात येनार आहे .या आजारां करीता सर्वांनी आपली सिकलसेल रक्त तपासणी करून घेन्याची गरज असुन ,गरोदर मातेंनी सुध्दा होनारे बाळांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वत: तपासणी करून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.जनेकरून प्रसुती करतांना सुध्दा सिकलसेल असनारे मातेची सुरक्षीत प्रसुती करून  घेण्यास सोईचे होईल. तसेच लग्नाआधी सुध्दा मुला व मुलीने आपली सिकलसेल तपासणी करून घेणे सुध्दा तेवढेच महत्त्वाचे आहे .

          या सप्ताह दरम्यान प्रत्येक गावात मोफत  सिकलसेल तपासणी होणार आहे याचा लाभ घेन्यात  यावा असे आव्हान डॉ.दिनेश डवरे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णाल काटोल  यांनी या वेळी केले. या कार्यक्रमा करिता प्रा.आ.केद्र कचारीसांवगा येथील आरोग्य निरीक्षक, आरोग्य  सहायिका, सी.एच.ओ. , आरोग्य सेवक, आरोग्य सेवीका, गटप्रवर्तक, आशा यांनी उपस्थितीत राहुन तपासणीस सहकार्य केले.