महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे करण्यात आले अभिनंदन .

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे करण्यात आले अभिनंदन .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन*

*राहुरी विद्यापीठ, दि. 24 ऑगस्ट, 2023*

             भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्त्रो) शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, बुध्दीमत्तेमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेमध्ये चंद्रयान तीनचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के उपस्थित होते. चंद्रयान तीन लॅडींग झाल्यानंतर सभागृहातील सर्व शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला.

         यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी चंद्रयान तीन मोहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले चंद्रयान तीन या मोहीमेने देशाच्या तंत्रज्ञानाची ताकद जगाला दाखवून दिली आहे. देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम यशस्वी झाली व देशाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले. देशातील शास्त्रज्ञ हे खरे आपल्या देशाचे हीरो असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील यांच्या सुचनेवरुन चंद्रयान तीन माहिमेतील सर्व शास्त्रज्ञांचा अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला.