भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने जि .प.प्रा.शाळातील विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य व खाऊचे वाटप
डॉ.आंबेडकर जयंती निमित्ताने जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, व खाऊचे वाटप...
शेवगाव :- शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव ने येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शालेय साहित्य व खाऊ वाटप करून उत्साहात साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, वंचित बहुजन विकास आघाडी शाखा ढोरजळगाव ने शाखेच्या वतीने जि.प.प्रा. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून डॉ.आंबेडकर जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री.शहादेव यांळस यांनी डॉ.आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे प्रत्येक व्यक्तीने अभ्यासले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्तित शाखा अध्यक्ष श्री.सौरभ काकडे, यशवंत पाटेकर. ब्रम्हनाथ डाके,ऍड.विजय कराड, डोळस पाटील, वैभव साके, बाप्पू साके, दीपक साके, प्रमोद बर्फे, अक्षय कांबळे, चंदू साके, प्रमोद शेलार व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शाळेतील शिक्षक व शिकेतर कर्मचारी विद्यार्थी याप्रसंगी उपस्तित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिर्के सर यांनी केले .आभार शाखा अध्यक्ष सौरभ काकडे यांनी मानले.