गडकिल्ल्यांच्या जतनासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे ठसा उमटविणारे प्रतिनिधित्व .

*गडकिल्ल्यांच्या जतनासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक; मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे ठसा उमटविणारे प्रतिनिधित्व*
महाराष्ट्र सरकारच्या वतीने गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व अतिक्रमण निर्मूलन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार सतीश केळकर आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन झाले.
राज्यभरातील विविध विशेष संघटनांना या बैठकीस आमंत्रित करण्यात आले होते. त्यात *मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान* यांना देखील मानाचे आमंत्रण देण्यात आले होते. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष *अमित दादा चव्हाण* आणि राज्य कार्याध्यक्ष *युवराज दादा म्हस्के* यांनी बैठकीत प्रतिष्ठानचे प्रतिनिधित्व केले.
या बैठकीदरम्यान गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणे, किल्ल्यांचे ऐतिहासिक स्वरूप जतन करणे, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने संवर्धन करण्यासाठी कार्ययोजना आखण्यावर सखोल चर्चा झाली. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानने यावेळी गडकिल्ल्यांच्या मूळ वास्तुशिल्पाच्या संरक्षणावर जोर देत काही महत्त्वपूर्ण सूचना व उपाय मांडले.
राज्य सरकारच्या या पुढाकाराला प्रतिष्ठानने सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, भविष्यात गडकिल्ल्यांचे जतन-संवर्धन अधिक व्यापक पातळीवर करण्यात येणार आहे.