वर्षाचे 365 दिवस सुरु राहणार चाईल्ड करीयर इंग्लिश स्कूल सलबतपुर चा ज्ञानयज्ञ.
*वर्षाचे 365 दिवस सुरू राहणार चाईल्ड करिअर चा ज्ञानयज्ञ*
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची शिक्षक पालक सहविचार सभा नुकतीच स्कूल च्या प्रांगणात पार पडली.सदर सभे दरम्यान संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली शाळा वर्षभर 365 दिवस सुरू ठेवण्यावर चर्चा झाली.पालकांनीही सदर संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत शाळा एकही दिवस बंद राहणार नाही यावर निर्णय घेण्यात आला.
गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह अप्रगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे अध्यापन सुट्टीच्या दिवशीही सुरूच ठेवण्याचा कृती कार्यक्रम शिक्षकांनी तयार केला आहे.संगणक ज्ञान,क्रीडा स्पर्धा,हस्ताक्षरातील सुधारणा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, ओलंपियाड परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा,मंथन परीक्षा,शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा तयारी तसेच इयत्ता 11 व12 वी साठी जादा तास व प्रात्यक्षिके त्याचबरोबर चित्रकला,नृत्य, नाट्य,क्रीडा,वकृत्व,या उपकरणांनी हा ज्ञानयज्ञ वर्षाचे 365 दिवस सुरू राहणार आहे.
गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल ही शाळा अल्पावधीत नावारूपास आली आहे.सध्या शाळेत नर्सरी ते 12 वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.आणि आता वर्षाचे 365 दिवस हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहणार असल्याने गुणवत्तेत आणखी वाढ होईल.असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक श्री सागर बनसोडे यांनी के
ले.