प्रवरा नदी स्वच्छतेचा व महतीचा परिक्रमेद्वारे संदेश ,एक अनोखा उपक्रम

प्रवरा नदी स्वच्छतेचा व महतीचा  परिक्रमेद्वारे संदेश ,एक अनोखा उपक्रम
प्रवरा नदी स्वच्छतेचा व महतीचा  परिक्रमेद्वारे संदेश ,एक अनोखा उपक्रम
प्रवरा नदी स्वच्छतेचा व महतीचा  परिक्रमेद्वारे संदेश ,एक अनोखा उपक्रम

"पाणी जीवन आहे " आणी सर्व भुप्रदेशाला पाणी उपल्बध करून देणा-या नद्या या जीवनदायीनी आहेत . हे सर्व शालेय जीवनात सर्वांनी वाचले असेल परंतु आज या नद्यांच्या संरक्षण आणी संर्वंधनाची गरज आहे . अहमदनगर जिल्हातुन वाहणारी पवित्र गोदावरी बरोबरच साक्षात श्री हरी विष्णुंच्या पायाच्या स्पर्शाने प्रवाहित झालेली व जिच्या काठावर सर्व देवी देवतांना वर प्राप्तीसाठी शिवलिंग स्थापले, अश्या अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या महती प्रसारणासाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द बन येथील हरिहर केशव गोविंद उत्सव समीतीच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासुन परिक्रमेचे ( प्रवरा नदीची प्रदक्षीणा ) आयोजन करण्यात येते .या परिक्रमेतुन नदी विषयी पूज्य भाव वाढावा व तिच्या पाण्याची पवित्रता जपावी हा संदेश गावोगावी दिला जातो . या साठी भजन किर्तनाद्वारे सामाजीक व आध्यात्मीक जागरण केले जाते .
     या उपक्रमाचे आद्य प्रवर्तक ह.भ.प बाबानंद महाराज वीर ( वीर भाऊसाहेब ) यांच्या अधिपत्याखाली यंदाच्या ३रया वर्षी ३ दिवसांची मोटारसायकल दिंडी काढण्यात आली . या मध्ये तरुण तसेच ज्येष्ठ अश्या ३८ जणांनी सहभाग घेतला . या मध्ये ५ महिलाही सहभागी होत्या . वयाच्या ७०च्या पुढे असणारे ९ जण या ४५० कि मी च्या मोटारसायकल परिक्रमेत आपआपल्या मोटारसायकल वर सहभागी झाले . या यात्रेत १६ मोटारसायकल व एक अॅपेरिक्षा सहभागी होती . शनिवार १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ः३०वा केशव गोविंद बनातुन सुरु झालेली हि यात्रा नदीच्या डाव्या बाजूने प्रवास करत कोल्हार आश्वी , संगमनेर , रंधा मार्गे संध्याकाळी ७ः००वा अमृतेश्वर ( प्रवरेचे उगमस्थान ) येथे मुक्कामी पोहोचले .  येथे हभप जयराम महाराज इदे यांच्यासह आदीवासी बांधवानी परिक्रमेचे स्वागत केले . दसऱ्या दिवशी सकाळी ७ः००वा परीक्रमा पूढील प्रवासास रवाना झाली . दूपारी अकोले येथील अगस्ती संस्थानच्या वतीने स्वागत व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली . संगमनेर , आश्वी कोल्हार असा नदीच्या उजव्या तटाने प्रवास करत संध्याकाळी उंबरगाव येथील कालभैरव मंदिरात मुक्कामी पोहोचली . येथे हभप आचार्य शुभम महाराज कांडेकर यांच्या वतीने स्वागत व प्रसादाचे नियोजन झाले . तिसऱ्या दिवशी चंपाष्ठीच्या योग साधत म्हाळसा देवीचे माहेर असलेल्या नेवासा येथील खंडोबा महाराजाचे दर्शन करुन, बहिरवाडीचे कालभैरव दर्शन व नंतर कायगाव टोका येथील गोदावरी प्रवराच्या पावन संगमात स्नान पूजा करून दिंडी पोहोचली देवगडच्या दत्त मंदिरात . येथे हभप प्रकाशानंद गीरी महाराजांचे  आर्शिवाद व बर्गे साहेब यांचा वतीने आयोजीत प्रसाद घेऊन परिक्रमा नेवासा येथील माऊली ज्ञानेश्वर मंदीरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास करत संध्याकाळी पून्हा बनातील केशव गोविंद मंदिरात पोहोचली . येथे समारोपाचा कार्यक्रम होऊन परिक्रमेची समाप्ती झाली .
  संपूर्ण प्रवासात ठिकठिकाणी मोठया भक्ती भावाने परिक्रमेचे स्वागत झाले . प्रवरा नदीच्या महती ची यामुळे सर्वत्र चर्चा झाली व नदीची स्वच्छता ठेवण्याचे अनेकांना स्फूरण ही झाले . अनेकांनी .पूढील वर्षी मोठया संख्येने सहभाग घेण्याचे सांगत या परिक्रमेचे मोठे कौतुक केले . या वेळी परिक्रमेत सहभागी झालेल्या सर्वांचे हरिहर केशव गोविंद उत्सव समितीच्या वतीने आभार मानन्यात आले .या परिक्रमेच्या आयोजनात हभप बाबानंद महाराज वीर यांच्यासह बी एम पूजारी साहेब , किशोर भगत , धनंजय हरदास , अनिल पूजारी , इदे महाराज , राम मेजर पूजारी , हरिहर केशव गोविंद ट्रस्ट बन यांनी विशेष परिश्नम घेतले .