जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्री अवघड येथे राज्यमंत्री श्री .बच्चुभाऊ कडू यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्री अवघड येथे राज्यमंत्री श्री .बच्चुभाऊ कडू यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न .

              राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी अवघड येथे माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक : 05/07/2022 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला .प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष माननीय सुरेशराव लांबे ,माजी अध्यक्ष श्री.प्रशांत पवार व बच्चुभाऊ कडू यांचे कट्टर समर्थक श्री .बापूराव पटारे यांनी शाळेतील सर्व मुला मुलींना वह्या व शालेय साहित्य वाटप केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून माननीय बच्चुभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

 

 

      यावेळी पिंप्रीअवघड ग्रामपंचायतचे सरपंच मा.परविन बानो शेख यांचा सत्कार करण्यात आला .त्याचप्रमाणे पिंप्री अवघड विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री . मच्छिंद्र लांबे, व्हा.चेअरमन श्री . रविंद्र पवार तसेच देवगंगा दूध डेअरीचे चेअरमन श्री.सोपान लंबे यांचाही सन्मान करण्यात आला .

 

 

        या कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित विद्यमान चेअरमन श्री .मच्छिंद्र लांबे यांनी मनोगत व्यक्त केले .शाळेतील शिक्षक श्री .गंगाधर जावरे व श्री . बबन गाडेकर यांनी शाळेविषयी माहिती दिली .वाढदिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार कृष्णा गायकवाड,लिंबाजी बाचकर, माजी उपसरपंच लहान तमनर,अनिल रसाळ, अरुण पवार, नारायण कांबळे, बादशहा शेख, बद्रीनाथ लांबे, साईनाथ दौंड, श्रीम. छाया पानसरे, श्रीम. संगीता बेदरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण मा.सुरेशराव लांबे यांनी केले .प्रास्ताविक शाळेतील शिक्षक श्री .अनिल पवार यांनी केले असून आभार प्रदर्शन श्री .अनिल कलापुरे यांनी केले आहे .

 

         नामदार बच्चुभाऊ कडू यांचा शाळेत साजरा होणारा वाढदिवस व या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मिळणारे शालेय साहित्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची पर्वनीच ठरली आहे .शाळा सुरू होऊन अनेक दिवस झाले तरिही काही विद्यार्थ्यांना आर्थिक टंचाईमुळे शालेय साहित्य घेता आले नव्हते .नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य मिळाल्यामुळे व शिक्षणासाठी येणारी खरी अडचण दूर झाल्यामूळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत असल्याचे दिसत होते . नामदार बच्चूभाऊंच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखेच समाजोपयोगी कार्य केल्याचे समाधानही खऱ्या अर्थाने नियोजन कर्त्यामध्ये दिसत होते .