ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन कडून 101 व्या मुलीचा शोध

राहुरी ता प्रति -

डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी पोलिसांकडून 101 व्या अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा शोध .

 *ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत राहुरी पोलिसांकडून मागील 9 वर्षात अपहरण झालेल्या तब्बल 101 मुलींचा मागील दोन वर्षात शोध घेऊन पालकांच्या ताब्यात....* 

   राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत तिच्या पालकांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 20.01. 2026 रोजी गुन्हा दाखल केलेला होता .  

सदर अल्पवयीन मुलीचा दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी शोध घेऊन राहुरी पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 

          दि.11/01/2026 रोजी रात्री 10.00 वा ते दिनांक 12. 1. 2026 रोजी रात्री दोन वाजण्याची सुमारास ही राहते घरातून कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 54/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदर मुलीचा सहा पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलीस हवालदार सुरज गायकवाड, पोलीस हवालदार सतीश आवारे, पोलीस नाईक डी डी कोकाटे, यांनी शोध घेऊन तीस पालकांचे ताब्यात दिले.तिचे अपहरणाबाबत सखोल तपास सुरू आहे.

     

                सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सहा पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ पोलीस हवालदार सुरज गायकवाड, पोलीस हवालदार सतीश आवारे, पोलीस नाईक डी डी कोकाटे यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ साहेब, व पोलीस नाईक कोकाटे हे करीत आहेत.